धुलिवंदनाला जबरदस्ती रंग लावला, जाब विचारायला गेलेल्या तरुणावर कोयता हल्ला करत पोटात दगड घातला

गुन्हे ठेवा: पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये सध्या मोठी वाढ झालीय. किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, दारूच्या नशेत होणारे राडे, अत्याचार, वाहनांची तोडफोड, कोयता हल्ल्यांसारख्या हिंसक घटनांनी पुणे गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर चर्चेत आहे. दरम्यान, आता आणखी एका घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. धुलीवंदनादिवशी भावावर रंग टाकल्याचा जाब विचारल्याने दोन तरुणांनी जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. पुण्यातील येरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेनंतर तक्रार द्यायला गेलेल्या तरुणाची तक्रार घ्यायला पोलिसांनी उशीर केल्याचा आरोप या तरुणाने केलाय. त्यामुळे पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ऋतिक मनोहर ननावरे(22) असे जखमी तरुणाचे नाव आहे.  धुलीवंदनादिवशी घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Koyta Attack)

नक्की घडले काय?

धुलिवंदन म्हटले की आपलेच राज्य अशा आर्विभावात वावरणाऱ्यांची कमी नाही. मग लहान असो किंवा मोठा कोणालाही रंग फासला, डोक्यात अंडी फोडली तरी काय होते अशा माजात अनेकजण वावरताना दिसतात.  पुण्यात  येरवडा भागातून धुलिवंदनादिवशी जात असताना रात्री 8.30 च्या सुमारास दोन भावांना जबरदस्तीने काही तरुणांनी रंग लावला. डोक्यात अंडी फेकून मारली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला दोन जणांनी  बेदम मारहाण केली. हे प्रकरण मारहाणीवर थांबले नाही. या दोन तरुणांनी रागाच्या भरात कोयत्याने वार करत एकाला जखमी केला. इतकंच नाही. दोघांनी तरुणाच्या पोटात दगड घातला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांमध्ये तक्रार देण्यास गेलेल्या तरुणाला पोलिसांनी “रंग पंचमी ची भांडणं करतो का?” असा उलटा जबाब विचारला आणि तक्रार घ्यायला पोलिसांनी उशीर केला अशी माहिती स्वतःऋतिक यांनी दिली आहे. याप्रकरणी बबल्या (पूर्ण नाव माहिती नाही), त्याचा मित्र अशा दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ऋतिक मनोहर ननावरे (२२) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धुलीवंदन दिवशी रात्री ८.३० वाजता येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संगमवाडी येथे घडली. फिर्यादी ऋतिक यांचे भाऊ रोहित ननावरे (१७) हे राजीव गांधी नगर परिसरातून जात असताना २ तरुणांनी त्यांना जबरदस्तीने रंग लावून त्यांच्या डोक्यावर अंड फोडलं. ही बाब रोहित यांनी त्यांच्या भावाला येऊन सांगितली. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारायला  गेलेल्या ऋतिक वर बबल्या आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून त्याला मारहाण करत कोयत्याने वार केले. इतकचं नाही तर त्या दोघांनी ऋतिक यांना पोटात दगड घातला. या हल्ल्यात ऋतिक जखमी झाले

हेही वाचा:

Beed Crime: बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ

अधिक पाहा..

Comments are closed.