महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार; 5 नवीन आमदार कोण?, पाहा यादी
महाराष्ट्र विधन परिषद निवडणूक 2025: विधानपरिषदेची 5 जागेसाठी होणारी निवडणूक (Maharashtra Vidhan Parishad Election 2025) अखेर बिनविरोध होणार आहे. विरोधकांकडून कोणताही अर्ज आला नसल्यामुळे महायुतीचे 5 उमेदवार विधानपरिषदेत बिनविरोध निवडून जातील.
विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे 2026 पर्यंत आहे. महायुतीकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची आज विधिमंडळात निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी पार पडली. यामध्ये सर्व अर्ज वैद्य ठरले. तर एक अपक्ष अर्ज या निवडणुकीत दाखल झाला होता पण या अर्जावर आमदारांची सही नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आला.
महायुतीकडून कोण कोण आमदार होणार?, 5 जणांची नावं-
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. विधानपरिषदेच्या पाच पैकी तीन जागांसाठी भाजपनं उमेदवार जाहीर केले होते. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विरोधकांकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोणताही अर्ज न आल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
महाराष्ट्राला मिळणार 5 नवे आमदार-
1. संदीप जोशी (नागपूरभाजप)
2. संजय केनेकर (छत्रपती संभाजीनगरभाजप)
3. दादाराव केचे (आर्वी, भाजप)
4. चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार, शिवसेना, शिंदे गट)
5. संजय खोडके (अमरावतीराष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची रचना
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. विधानसभेप्रमाणं परिषद दर 5 वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून 7 आमदार, पदवीधरांमधून 7 आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा यातून 12 आमदारांची नियुक्ती करतात.
संबंधित बातमी:
Vidhan Parishad Election 2025: एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
अधिक पाहा..
Comments are closed.