‘होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबीनमध्ये होते’ एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ गौप्यस्फो

उधव ठाकरे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी विधिमंडळात मोठा गौप्यस्फोट केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. त्यांनी  नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेऊन माफी मागितली होती, असा दावा शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या याच दाव्यावर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी एका वाक्यात शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय.

होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे….

उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद आणि नागपूरमध्ये निर्माण झालेली दंगलसदृश स्थिती यावर आपली भूमिका माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना ‘तु्म्ही दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांच्यापुढे माफी मागितली असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्यात काय तथ्य आहे,’ असा सावाल केला. यावर बोलताना “होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलंच नाही. चला जय हिंद,” असं एका वाक्यात उत्तर दिलं. त्यांनी दिलेल्या या खोचक उत्तरानंतर एकच हशा पिकला.

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान त्यांनी औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीवरही भाष्य केलं. “औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. तो महाराष्ट्रातील मातीला जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शवप्रेमी करणार नाही. कोणी त्याचं थडगं उखळण्याची भाषा करत असेल तर भाषण आणि आंदोलन करू नये,’ असं भाष्य ठाकरे यांनी केलं. तसेच डबल इंजिन सरकार नुसत्या वाफा सोडत आहे का? मुख्यमंत्र्‍यांनी औरंगजेबाची कबर उखढण्यात असमर्थता दाखवली आहे. औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचं संरक्षण आहे, असंही ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी काय दावा केला?

एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात निवेदन देत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता भाष्य केलं. “यांचे प्रमुख मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा, असे म्हणाले. मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. पण इकडे येऊन पलटी मारली,” असे एकनाथ शिंदे विधानपरिषदेत बोलताना म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=A0Tjro_qe4q

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका

Udayanraje Bhosle: ‘दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा..’उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले’ काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केले

आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी? एकनाथ शिंदे केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची शक्यता!

अधिक पाहा..

Comments are closed.