नागपूर सावरतंय! 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात संचारबंदी अनिश्चित काळासाठी कायम

नागपूर हिंसा: छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar) औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागलं. परिणामी, कधी नव्हे ते उपराजधानीत ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली. सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. तर शहरातील संचार बंदी तर रुट मार्च काढला. (Police Route March) पोलिस अजून काही लोक अप्रिय घटना घडवण्याच्या तयारीत तर नाहीत ना याची पाहणी करुन अभ्यास करणार आहेत. तसेच परिसरातील नागरिकांच्या पाठीशी सुरक्षेसाठी पोलिस आहेत, असा विश्वास दर्शविणार आहेत.

दुसरीकडे, सध्या तरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील काही भागात जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे. तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

उपराजधानीचे जनजीवन आज सामान्य पद्धतीने सुरु

दरम्यान,आज (19 मार्च) नागपूरची दैनंदिन सुरवात नियमितप्रमाणे  झाली आहे. दंगल सदृश प्रभावित क्षेत्र वगळता आज नागपूरमध्ये जनजीवन सामान्य पद्धतीने सुरु आहे. नागपूर मेट्रो, शहर परिवहन सेवा, राज्य परिवहन सेवा देखील नियमित पद्धतीने सुरु आहेत. मात्र 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात फक्त संचार बंदी लागू असणार आहे. दुसरीकडे नागपुरात काही भागात सध्या तणावपूर्वक शांतता आहे. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी संचारबंदी क्षेत्रात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी  घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता  कायम असल्याचे दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला ‘तो’ एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला

अधिक पाहा..

Comments are closed.