भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणा
मुंबई: राज्यातील विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अधिवेशनाचे काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचा नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे मात्र अजूनही त्यावर कोणता निर्णय झालेला नाही. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचे नेमके काय होणार? या अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आलेला नाही.
पुढील 5 ते 6 दिवसात निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असे दोन अधिवेशन विधानसभा विरोधी पक्षनेते पदाविना जाणार आहेत. विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात विरोधी पक्षनेते पदाचा चेंडू टाकला आहे. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदासाठीची पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. यावर लवकर निर्णय विधानसभा अध्यक्ष घ्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
या अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का?
पुरेसं संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या एवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत. जर विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तरच विरोधकांना हे पद मिळू शकतं अशा चर्चा सुरू होत्या. या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का? असा सवाल उपस्थित होत असताना विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतेही खास तरतूद नसल्याचं विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना उत्तर दिलंय. विरोधी पक्ष नेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता तरी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार की हे अधिवेश देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=evunccx6nsu
– 25 नोव्हेंबर 2024 – भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला पत्र दिले – यामध्ये महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते , या संदर्भात कोणता कायदा आहे याची माहिती मिळावी अशी पत्रात मागणी केली
– 9 डिसेंबर 2024 – महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून भास्कर जाधव यांना पत्राचे उत्तर मिळाले – विधानसभा विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही तरतूद नाही, विधानसभा अध्यक्ष आपल्या अधिकारात विरोधी पक्ष नेते पदा संदर्भात निर्णय घेतात, असे उत्तर दिलं
– हिवाळी अधिवेशनानंतर मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या त्यामध्ये विरोधी पक्षनेते पदा संदर्भात चर्चा झाली
– 28 फेब्रुवारी 2025 – मातोश्रीत ठाकरेंच्या शिवसेना आमदारांच्या झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असा ठराव करण्यात आला
– 4 मार्च 2025- विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देऊन विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेते पदासाठी गटनेते भास्कर जाधव यांची शिफारस करण्यात आली
– 4 मार्च ते 19 मार्च दरम्यान जवळपास पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची दोन वेळेस भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदा संदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली
अधिक पाहा..
Comments are closed.