38 वर्षाचा फहीम, दहावीपर्यंत शिक्षण, नागपूर राड्याचा सर्वात मोठा ठपका असलेला फहीम खान कोण?
नागपूर व्होइलेन्स: नागपूर तणावाबाबत (Nagpur Voilance) एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफआयआरनुसार फहीम शमीम खानने (Fahim Khan) जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. महत्वाचं म्हणजे हाच फहीम खान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास गेला होता.
नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी 51 लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम शमीम खान याचं नाव आघाडीवर आहे. फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांचा जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात आरोप फहीम खानने पोलिसांकडे केला. यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरदेखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली.
विधानसभा निवडणुकीत फहीम खानचा पराभव-
फहीम खान 38 वर्षांचा असून त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. फहीम खानने हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम
नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे.
पोलीस महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न-
नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केला. नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आली.
नागपूर राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=28bz6dztbbw
संबंधित बातमी:
Nagpur Voilance: महिला पोलिसावर हात टाकला, वर्दीही खेचली, नागपुरातील भयानक CCTV ताब्यात
अधिक पाहा..
Comments are closed.