…किमान आता तरी CM फडणवीसांनी औरंगजेबाची कबर कायमची हटवावी : शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती
शंकराचार्य प्रजनंद सरस्वती: ज्या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले, ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्या हिंदू धर्माच्या अनुयायींना त्यांचा धर्म विचारून मारले जात आहे, हे दुर्दैवी असून याचा विचार केला पाहिजे. असे मत शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज (Shankaracharya Pragyanand Saraswati) यांनी व्यक्त केले आहे. पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) मधील घटना थेट धर्मावर हल्ला असून ज्या हिंदू धर्मामुळे भारत भूमी ओळखली जाते, त्या हिंदू धर्मावर हा हल्ला असल्याचे ही शंकराचार्य म्हणाले.
ज्या औरंगजेबाशी लढताना छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्याच औरंगजेबचे वंशज आज कट्टरपंथी आणि दहशतवादी म्हणून हिंदू धर्मियांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून औरंगजेब ची कबर कायमची हटवावी. जर महाराष्ट्रातून औरंगजची कबर सरकार हटवणार नसेल तर सनातन हिंदू धर्मियांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. ते नागपूर येथे बोलत होते. पहलगाममध्ये हिंदूंची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याशी आम्हाला सूड नको, तर त्यांना दंड द्यायचा आहे. सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा ही आमची अपेक्षा असल्याची शंकराचार्य म्हणाले.
….त्याच नेत्यांमुळे गेले सत्तर वर्ष देशात दहशतवाद पोसला गेला- शंकराचार्य
दरम्यान, जे नेते पहलगाम मधील दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असे खोटे दावे करत आहे, मुळात त्याच नेत्यांमुळे गेले सत्तर वर्ष देशात दहशतवाद पोसला गेला आहे असे सांगत शंकराचार्य यांनी शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांचाही चांगलाच समाचार घेतला.काही मतांसाठी असे नेते धार्मिक दहशतवादाला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही, तर सरकारसोबत उभे राहण्याची आहे. असे ही ते म्हणाले.
प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं- स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
दरम्यान, याच विषयावर बोलतांना जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही मोठं वक्तव्य करून या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं असा संदेश पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं दिला आहे. गरज भासल्यास हिंदूंनी शस्त्र, शास्त्राचा अभ्यास करावा. वेळ पडल्यास स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी शस्त्र बाळगावीत, असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.