पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल, नेमकं काय आ

पुणे: शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली तक्रार त्यानंतर चक्र फिरली आणि खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये तक्रारदार विद्यार्थ्यांकडून आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे या विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता. मात्र, त्याच्या तक्रारीची योग्य दखल कॉलेज पातळीवर घेतली गेली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार थेट मंत्रालय स्तरावरती केली. त्यानंतर सर्व चक्रे वेगाने फिरली. काल (मंगळवारी) रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

रुग्णालय प्रशासनाचे मौन

या प्रकाराबाबत सर्वांनीच ‘मौन’ बाळगले असून, माध्यमांपर्यंत माहिती पोहोचू नये याची दक्षता रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. ससूनचे अधिष्ठाता डाॅ. एकनाथ पवार यांनी देखील या प्रकरणावर मौन बाळगलं असून त्यांची देखील कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आल्यानंतर खळब उडाली आहे. मात्र माहिती बाहेर येवू नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली असल्याने प्रकरणाची माहिती बाहेर आल्याची चर्चा आहे. ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांचं या प्रकरणावर मौन बाळगले आहे. अस्थिरोग विभागांतील विद्यार्थ्याचे रॅंगिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

बी जे महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्यांना वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली होती.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या नातवावर पुण्यातील बी.जे. मेडीकल वैद्यकिय महाविद्यालयात रॅगींगचा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. हा मुलगा बीजे मेडीकल वैद्यकीय महाविद्यालयात एम एस होण्यासाठी आर्थोपेडीक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. याच डीपार्टमेंटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रॅगींग केल्याचा आरोप आहे.

पहिला वर्षात शिकणाऱ्या या मुलाला त्यांचे दोन सिनिअर्स डीपार्टमेंटमधे डोक्यावरुन कधी गार पाणी ओतून घ्यायला लावायचे तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे. या मुलाने ही गोष्ट आधी आर्थोपीडीक डीपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉक्टर गीरीष बारटक्के यांना सांगितली. मात्र त्यांनी पुरेशी दखल घेतली नाही, असा या मुलाचा आरोप आहे. त्यानंतर ससून रूग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांना देखील ही बाब सांगण्यात आली. मात्र त्यांनीही पुरेशी दखल न घेतल्याने मुंबईला वैद्यकिय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर दोन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.