राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
उधव तेकर आणि राज ठाकरेवरील शरद पवार: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चांदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांसह परदेशात गेले होते. काल (29 एप्रिल) राज ठाकरे परदेश दौऱ्यावरुन परतले आहेत. तर उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत परतणार असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी देखील शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीवर माध्यमांशी प्रश्न विचारला होता. मात्र त्यावेळी शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आज पुन्हा शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर माध्यमांशी प्रश्न विचारला. आज मात्र यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार काय म्हणाले?
एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असं शरद पवार म्हणाले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदीर उभारण्यात आले. आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
नरेंद्र मोदींना आमचं पूर्ण सहकार्य- शरद पवार
पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, यामध्ये ज्यांचे कुटुंबीय शहीद झाले, त्यांनी या देशासाठी किंमत दिलीय, इथे धर्म जात पात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांवर हल्ला कुठल्या शक्तींचा होत असेल तर देशवासिय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी याबाबत जी काही उपाययोजना करत असतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य आहे, असं शरद पवारांनी सांगितले.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=Y8FIQ8SL1EI
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.