देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; विवेक फणसळकर मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त

देवन भारती: भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (देवन भारती) यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. विवेक फणसळकर आज मुंबई पोलिस आयुक्तपदावरून आज (बुधवारी) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती (देवन भारती) यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त फणसळकर आज सेवानिवृत्त

गेली 35 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आज (बुधवारी) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी पोलिस आयुक्तपदी कोण नियुक्त होणार, याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत देवेन भारती?

1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भारती सुमारे 54 वर्षांचे आहेत.  भारती मूळचे  बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा आणि त्यानंतर सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर ते होते. ते राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS चे प्रमुख देखील होते. महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय

1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते

अधिक पाहा..

Comments are closed.