हर्षवर्धन सपकाळांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? सपकाळांनी दिलं स्पष्टीकरण

हर्षवर्धन सपकल: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली. शरद पवार हे खुप अनुभवी नेते आहेत. मी अध्यक्ष झाल्यानंतर त्याची भेट घेतली नव्हती असे सपकाळ म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही. प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत काय सुरु आहे हे मला माहीत नाही असेही सपकाळ म्हणाले.

मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींचा जप करत असतात

राज्यात सरकारच नाही तर निसर्गही अवकाळीपणा करत आहे. शेतीवर मोठ संकट आलं आहे. आस्मानी संकटात सरकारचे सुलतानीही संकट झेपावले आहे. त्यामुळं तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे असे सपकाळ म्हणाले. सामाजिक न्याय विभाग अदिवासी विभाग यांच्या निधीवर डल्ला मारण्याचं काम वित्त विभाग करत आहे. राज्यपाल यांनी तात्काळ यात लक्ष घातलं पाहिजे असे सपकाळ म्हणाले. मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींचा जप करत असतात. त्यांची खरंच पत असेल तर त्यांनी विशेष पॅकेज मंजूर करुन आणलं पाहिजे असे सपकाळ म्हणाले. शेतकरी कर्ज माफी करावी, कंत्राटदारांचे पैसे बाकी आहेत ते तात्काळ दिले पाहिजेत. कृषी विभागाचं नाव घेतलं की ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात असे म्हणत सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.

सरकार शेतकऱ्यांना सावकारांकडे पाठवतेय

कर्जाच पुनर्गठन करायचा नसेल तर शेतकरी सावकराकडे जातील. याचा अर्थ आहे की शेतकऱ्यांना सरकार सावकारांकडे पाठवत आहे, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 21 मे रोजी राजीव गांधी यांच्या शहीद दिनाच्या दिवशी आम्ही राज्यभरात तिरंगा यात्रा काढून या हल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांनी आणि सैन्यांना सलाम करणार असल्याचे सपकाळ म्हणाले.

दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत पक्ष संघटने संदर्भात चर्चा

दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीला महाराष्ट्रातील नेते सहभागी होते अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. या बैठकीत पक्ष संघटने संदर्भात चर्चा झाली. कोणतीही नकारात्मक चर्चा झाली नसल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=Ksnp7tcnzvo

महत्वाच्या बातम्या:

Harshvardhan Sapkal : महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटणार?

अधिक पाहा..

Comments are closed.