जशी चाणक्य नीती आहे तशी पवार नीती! शरद पवार-अजित पवार एकत्र असल्याचे माझ्याकडे पुरावे : कडू

बॅचू कडू: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा जोर धरत आहे. यावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची गरज काय ? ते आधीपासून एकत्र असल्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहे असं वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलं. जशी चाणक्य नीती आहे तशी पवार नीती असल्याचे कडू म्हणाले.

कोकणात व मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी मतदान यादीत नाव असलेल्या मराठी मतदारांनी मुंबईत मतदान करु नये यासाठी भाजप नवीन परिपत्रक आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. दोन ठिकाणी मतदान केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या तयारीही राज्य सरकारने दर्शवली आहे. मतदार कार्ड आधारशी लिंक हा यातलाच एक भाग असल्याचा बच्चू कडू यांनी केला आहे. औरंगजेबासारखे भाजप मराठी माणसावर चालून येत असल्याचे कडू म्हणाले.

राज्यकर्त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही रक्तदान आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन बच्चू कडू यांनी आज नागपूरमध्ये  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरचे काही मीटर अंतरावर असलेल्या ट्राफिक पार्क रक्तदान आंदोलन केले. राज्यकर्त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही रक्तदान आंदोलन करत असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. आता कर्जमाफी केली तर मतदार विसरुन जाईल म्हणून राज्य सरकार कर्जमाफीसाठी येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

2 जूनला अजित पवार यांच्या बारामती येथील घरासमोर आंदोलन

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची त्यांना आठवण करुन देण्यासाठी आजचे आंदोलन होते. 2 जूनला अजित पवार यांच्या बारामती येथील घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असेही शरद पवारांनी सूचवले होते. त्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, आधी देश महत्त्वाचा आहे, सध्या देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहाता यास प्राधान्य आहे, त्यानंतर एकत्रिकरणाचं पाहू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=fjyizbl8zlo

महत्वाच्या बातम्या:

आधी माफी मागा, मगच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा; अमोल मिटकरींनी सांगितला अटी-शर्थीचा फॉर्म्युला

अधिक पाहा..

Comments are closed.