संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा पेपरफुटी थांबवा; आदित्य ठाकरेंनी टीईटी पेपरफुटीवरून भाजप

TET परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी आदित्य ठाकरे राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी (TET Paper Leak) प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकार आणि भाजप (BJP) वर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करत त्यांनी वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर संताप व्यक्त केला.

Aaditya Thackeray on TET Exam Paper Leak: नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला. भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने. गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे. दरवर्षी तरुण-तरुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीका केलीय.

TET Exam Paper Leak: उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलली

दरम्यान, रविवारी (28 जून) होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी अधिकृतपणे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी (Bhiwandi) येथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता काही संशयितांकडे टीईटी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न असल्याचे आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न जुळत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षा परिषदेने स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, परीक्षेच्या आदल्या दिवशीच परीक्षा स्थगित झाल्याने राज्यभरातील लाखो परीक्षार्थींमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

आणखी वाचा

Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

Comments are closed.