आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना नवी जबाबदारी लवकरच दिली जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली. आदित्य ठाकरे यांना लवकरच कार्याध्यक्षपदाची दिली जाऊ शकते. आदित्य ठाकरे सध्या पक्षात घेत असलेल्या जबाबदाऱ्या, त्यांनी आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी केलेलं काम पाहता त्यांना हे पद दिले जाण्याची चर्चा सुरू झाली.
चर्चा सुरू झाल्यानंतर अर्थातच या सगळ्या संदर्भात त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या, त्यांच्या विरोधातील पक्षातील नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या बातमीत कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचं आणि अशा प्रकारची पक्षात चर्चा सुरू नसल्याचं स्पष्ट केलं.
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपदाची नवी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या पक्षात सुरू असल्याची माहिती समोर आली. आदित्य ठाकरे यांनी लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान केलेले काम, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेतलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्याचा विचार करता त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे.
सद्यस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते त्यासोबतच युवासेना प्रमुख आहेत. मंत्री म्हणून सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी काम बघितलं आहे. त्यामुळे प्रशासकीय अनुभवसुद्धा आदित्य ठाकरेंना आहे. दोन टर्मचे ते आमदार आहेत.
पक्षातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो, शिवाय राज्यभरात पक्ष बांधणीसाठी आणि संघटनात्मक निर्णयांसाठी सुद्धा त्यांचा पुढाकार असतो. निवडणुकांमध्ये प्रचाराची धुरा असू द्या किंवा पक्षाची रणनीती, आदित्य ठाकरे यांचा त्यात सहभाग असतो.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर ते वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडताना पाहायला मिळतात. त्यामुळे ज्या प्रकारे 2003 साली उद्धव ठाकरे यांना शिवसेनेमध्ये कार्याध्यक्षपद दिलं होतं आणि तशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना सुद्धा जून महिन्यात पक्षाच्या वर्धापन दिली हे पद दिले जाईल अशी चर्चा आहे.
मात्र अशा प्रकारची चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे विरोधी पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना खोचकपणे टीका केल्याचं दिसून आलं.
ज्याप्रकारे ही बातमी समोर आली आणि या चर्चा सुरू झाल्या, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या चर्चे संदर्भात एक स्पष्ट करत माहिती दिली. अशा प्रकारची कुठलीही चर्चा पक्षात झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे.
ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.
🚨 कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! 🚨— Aaditya Thackeray (@AUThackeray) 15 एप्रिल 2026
ठाकरेंच्या शिवसेनेची सध्याची स्थिती पाहता आणि आदित्य ठाकरे उचलत असलेल्या जबाबदाऱ्या पाहता तरुण चेहऱ्याला वेगळी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनात आणि पक्षाला एक वेगळी उभारी देण्याच्या विचारातून आदित्य ठाकरे जरी या सगळ्या पदासंदर्भात कुठलीही चर्चा नाही असे सांगत असले तरी भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना अशा प्रकारची जबाबदारी दिली तर आश्चर्य वाटायला नको.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.