स्वत:चा स्वार्थ लपवण्यासाठी निर्लज्जपणे निष्ठा विकली; जनताच त्यांचे ‘ऑपरेशन’ करेल, आदित्य ठाकरेंचा गद्दार खासदारांवर निशाणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना शिंद गट वगैरे काही नसून एकच शिवसेना असून ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. दुसरे भाजपचे गुलाम आहेत. हे विकाऊ लोक उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर एनडीए विरोधात निवडून आले होते. स्वत:चा स्वार्थ, हावरेपणा लपवण्याठी निर्लज्जपणे त्यांनी आपली निष्ठा विकली. आता लोकंच त्यांना मतदारसंघात उत्तर देतील आणि कुठले ऑपरेशन करायचे ते ठरवतील, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गद्दार खासदारांवर केला. ते मुंबईत विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधत होते.

Comments are closed.