संजय दिना पाटलांची पत्रकारांना ‘मारून टाकेन’ची धमकी; आता आदित्य ठाकरेंचं मग्रूर खासदाराला खुलं
संजय दिना पाटील यांच्यावर आदित्य ठाकरे : शिवसेना ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना थेट शिवीगाळ आणि अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत संजय दिना पाटील यांना जाहीर राजीनामा देण्याचे खुले आव्हान दिले आहे.
Sanjay Dina Patil: संजय दिना पाटील यांची पत्रकारांना ऑन कॅमेरा धमकी
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी, ‘माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत’, अशी फुशारकी मारली होती. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणावर आणि त्यांची मुलगी व ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत संजय दिना पाटील यांनी अत्यंत गैरवर्तन केले.
प्रसारमाध्यमांवर संतापत संजय दिना पाटील म्हणाले की, “तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा. तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता, आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय? मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे,” असे त्यांनी म्हटले.
Aaditya Thackeray on Sanjay Dina Patil: आदित्य ठाकरेंचं खुलं आव्हान
पत्रकारांशी झालेल्या या गैरवर्तनानंतर आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, “हे आता मिंधे प्रतिनिधी झाले आहेत, लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत. शिवीगाळ करत आहेत, धमक्या देत आहेत, दादागिरीचा आव आणत आहेत. तुमच्यात थोडी जरी हिंमत आणि लाज असेल तर आज खासदारकीचा राजीनामा द्या आणि भाजप किंवा मिंध्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवा. पत्रकारांना शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला राहिलं. पण, तुमच्यात एवढाच दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. चला हिंमत दाखवा,” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना दिलंय.
आणखी वाचा
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Comments are closed.