‘नाहीतर मी विसरून जाईन मी खासदार आहे..’ कॅमेऱ्यासमोरच संजय दीना पाटलांची मग्रुरी; सत्तेत गेल्य
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर पार पाडत शिवसेना ठाकरे पक्षाचे ६ खासदार फोडले. तर आठवड्याभरापूर्वीच शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी एक असलेले खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तर आज संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना ते भडकले, यावेळी रागाच्या भरात त्यांची जीभ चांगलीच घसरली. संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना अरेरावी करत शिवीगाळही केली. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय पाटील यांनी अतिशय अर्वाच्च भाषा वापरली. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकीही दिली. त्याचबरोबर रेकॉर्ड करा, दाखवा, काय करायचं ते करा मी तयार आहे, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांना पत्रकारांनी त्यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारताच ते भडकले.(Sanjay Dina Patil)
Sanjay Dina Patil : मी तुम्हाला मारुन पाठवेन
राजुल पाटील यांच्याबाबतच्या राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी आज शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली. (Maharashtra Politics news)
Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील कॅमेऱ्यासमोर नेमकं काय-काय म्हणाले?
– अरे भाई कशाला बस झाला ना आता, तुला बोललो दोन मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय, चल बस माझ्याबरोबर, बस ना गाडीत. चल गाडीत बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला, कशाला, इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला,
– ठीक आहे ठीक आहे
– जरा माझं हे बघू नका तुम्ही, अत्ती करताय हे, भाई बस ना बंद कर ना आता, बंद कर नाहीतर भाई, मी विसरून जाईन मी
खासदार आहे, तुम्ही काय आहे, पहिला पण सांगितलंय मी, भाऊ इज्जत करतो, इज्जत करा, उगाच तुम्ही माझ्या XXXX मध्ये बोट घालू नका. रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका.
– उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उभा ठेवतोय, तुम्हाला जेवायला देतोय, बरोबर, काय उगाच त्यांच्याकडे जाल ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलले लिहायचं ते लिहा लिहा रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन, कंप्लेंट करा, इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं,
– अरे लिमिट आहे, कुठल्या गोष्टीची बोलली आहे, ना ती सांगितलं ना सर्व, आता काय बोलायला येऊ नका माझ्याकडे, आला तर मी मारणार, आता रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, त्या दिवशी एक रिपोर्टर माझ्या घरात घुसला, पोलिस आहेत त्यांच्या समोर सांगतोय मी, एक जण घरात आला, माझी बायको, मुलं झोपलेली आहेत, सुना आहेत, तो रेकॉर्ड करत होता, काही लिमीट आहे का नाही असंही पुढे ते म्हणालेत.
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Comments are closed.