मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ने 40 स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर; अरविंद केजरीवालांसह क
AAP BMC निवडणूक 2026: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 40 स्टार प्रचारकांची यादी (Aam Aadmi Party released 40 star campaigners list) सोमवारी जाहीर केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी, राज्यसभेचे खासदार संजय सिंह उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुंबईत येणार आहेत.
‘आप’ने मुंबईत निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली असून सर्वच्या सर्व 227 जागांवर ते निवडणूक लढविणार आहेत. पहिल्या यादीत पक्षाने 21 उमेदवारांची नावेही जाहीर केली आहे. तसेच सर्व उमेदवारांनी नुकतीच प्रचारालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, पक्षाने सोमवारी निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यादीत राज्यसभा खासदार संजय सिंह, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, आम आदमी पार्टीचे संघटनात्मक नेते दुर्गेश पाठक यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील व मुंबईतील स्थानिक पातळीवरील नेतृत्वालाही प्रचाराची जबाबदारी देण्यात आली असून मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन, किशोर मंध्यान, रुबेन मस्कारेन्हास, विजय क्षीरसागर, अजिम फारुकी, विजय कुंभार, मुकुंद किर्दत यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. (BMC Election 2026)
आगामी BMC निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली! pic.twitter.com/Vt809juXpH
– आप मुंबई (@AAPMumbai) 22 डिसेंबर 2025
पहिल्या यादीत आपने 21 उमेदवारांची नावेही जाहीर- (AAP Candidate List BMC Election 2026: )
- प्रभाग 3- राजेंद्र (राजन) रामधर मिश्रा
- प्रभाग २३- टिळककुमार चौधरी
- प्रभाग 29- राजबली रामबरन साहनी
- प्रभाग 31- पुनम आशिष दास
- प्रभाग 40- जिलाजीत रामशाबाद याडव
- प्रभाग ४३- इरफान नवाब खान
- प्रभाग 48- लार्झी वर्गीस
- प्रभाग 53- रवींद्र डोडिये
- प्रभाग 54- महेंद्र भोसले मालुसरे
- प्रभाग 83- प्रीती सुंदर पद्ममुख
- प्रभाग 90- सुरेश केशव आचार्य
- प्रभाग १३४- नसरीन साजिद खान
- प्रभाग 146- बहुसाहेब रांगनाथ वर्थे
- प्रभाग 148- नीता किरण सुघाटणकर
- प्रभाग 151- ज्योती विजय क्षीरसागर
- प्रभाग 190- प्रणाली गिरीश राऊत
- प्रभाग 206- अशोक रामदुलार उपाध्याय
- प्रभाग 211- मोहम्मद अस्लाम मुनीर मर्चंट
- प्रभाग 221- जुनैद जमील खान
- प्रभाग 225- दीपक राजन सिलन
- प्रभाग 227- मॅराएट हर्मिट डॅकॉस्टा
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election 2026)
नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.