घातपात नाही तर हा अपघात! सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूवर गावकऱ्यांची स्पष्ट भूमिका, म

Parli Accident : राज्यासह सध्या चर्चेत आलेलं बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात गाजत असतानाच बीडमधील आणखी एका सरपंचाचा बळी गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यातच आता परळी (Parli) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर (Abhimanyu Kshirsagar) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. आता याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. एकीकडे संतोष देशमुख प्रकरण गाजत असतानाच आणखी एका सरपंचाचा जीव घेल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत, अशातच क्षीरसागर यांच्या गावातील लोकांंनी आणि सरपंच यांनी हा घातपात नसून हा अपघात असल्याचं सांगितलं आहे.

क्षीरसागर यांचे कोणाशीही वैर नव्हते…

बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली होती. या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे. क्षीरसागर यांचे कोणाशीही वैर नव्हते सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सरपंच होते. त्यामुळे यात कुठलाही घातपात झाल्याचा कुठलाही संशय आम्हाला नसल्याचे देखील ग्रामस्थ व नातेवाईकांनी म्हटले आहे. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेला टिप्पर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता यांच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा

अभिमन्यू क्षीरसागर यांची दुचाकी अक्षरशः चेंदामेंदा झाली आहे. दुचाकीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, हा अपघात इतका भीषण आहे की, त्या दुचाकीचा एक-एक भाग विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे.

घातपात की अपघात याचा शोध…- सुरेश धस

सुरेश धस म्हणाले की, काल रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली आहे. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे, याचा करिश्मा बघा. रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टीप्पर बंद नाहीत. या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

नेमकं काय आहे प्रकरण?

परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. त्यात अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सरपंचाच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर हे रात्री त्यांच्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत.

अधिक पाहा..

Comments are closed.