ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार


1. दिल्लीत शिकणाऱ्या सांगलीच्या दहावीच्या विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत संपवलं जीवन; शिक्षकांवर गंभीर आरोप, सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना, https://tinyurl.com/6ftpvp7m शाळेतील शिक्षकांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप, शौर्य पाटीलच्या वडिलांनी सांगितला घटनाक्रम https://tinyurl.com/2s4accfd

2. मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा लवकरच ‘श्रीगणेशा’; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून मनसेला 70 जागा देण्याची तयारी, 125 जागांची यादी तयार असल्याची माहिती समोर https://tinyurl.com/m6k84ee6

3. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, प्रकृतीचं दिलं कारण https://tinyurl.com/mrya7yb5 नागपूर जिल्ह्यात सुनील केदारांनी भाजपची सुपारी घेऊन पंजा गोठवला, RSS च्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी; काँग्रेस पदाधिकाऱ्याने थेट हायकमांडला धाडलं पत्र, पक्षातील संघर्ष शिगेला https://tinyurl.com/ypuwb89z

4. अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, राज्यातील वाद राष्ट्रीय स्तरावर नेत नाहीत
https://tinyurl.com/y9edjb6t एकनाथ शिंदेंकडून तक्रारींचा पाढा; अमित शाहांनी एक वाक्य बोलत विषय संपवून टाकला, म्हणाले, या संपूर्ण घडामोडींकडे माझं लक्ष https://tinyurl.com/3dsut66w ‘बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं’ एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका https://tinyurl.com/37ms55kj

5. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी विजयी; महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध निवड https://tinyurl.com/4vzs6n2b अनगर नगरपरिषेदत अर्ज बाद झाल्यानंतर उज्वला थिटे न्यायालयात दाखल; उमेश पाटील म्हणाले,राजन पाटलांना माफ करणार नाही https://tinyurl.com/skpxv9v7

6. अमरावतीतील चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरसेवकपदी बिनविरोध, आमदार रवि राणांचा मुख्यमंत्र्यांना फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन https://tinyurl.com/3kne2bk8 फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरसेवकपदी बिनविरोध; यशोमती ठाकूरांचा आरोप https://tinyurl.com/34mswn5b

7. पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या बुलढाण्यातील काँग्रेस नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज https://tinyurl.com/3dy42ftf माझं आजारपण कॅन्सरपर्यंत गेलंय, फडणवीस साहेबांनी याचा विचार करायला हवा होता; सांगोल्यातील फोडाफोडीवरुन शहाजी बापूंची भावनिक साद https://tinyurl.com/36sv4d2x

8. ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत ‘थार’ कोसळली, अपघाताची घटना दोन दिवसांनी समोर; पुणे जिल्ह्यातील 4 युवकांचा मृत्यू https://tinyurl.com/bdece55t नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट; विविध उपाययोजना निश्चित https://tinyurl.com/4d7pskv5

9. मराठी बोलण्याची लाज वाटते का?; लोकलमध्ये भाषिक वाद अन् कॉलेजवयीन अर्णव खैरने जीवन संपवलं; कल्याणमधील घटनेनं सगळे हळहळले
https://tinyurl.com/293v87dr मुंबईच्या पुनर्विकासासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी होणार माफ https://tinyurl.com/82h626za

10. नितीश कुमारांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, देशाच्या राजकारणात नवा विक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन https://tinyurl.com/yhbj9d9v ‘मी या पदावर कायम राहू शकत नाही’; काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या https://tinyurl.com/5393hdfk

*एबीपी माझा स्पेशल*

माणुसकी वाऱ्यावर, पुण्यात भर थंडीत 16 वृद्ध उघड्यावर; एबीपी माझाच्या बातमीनंतर वृद्ध पुन्हा वृद्धाश्रमात, नेमकं प्रकरण काय?
https://tinyurl.com/2yxzeedh

मुंबईतला जन्म, परदेशात शिक्षण, कोकणात सासर; अडखळत मराठी बोलण्यावरुन ट्रोल झालेल्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले कोण? https://tinyurl.com/mey9pbem

चांदी 2280 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या सोने अन् चांदीचे नवे दर
https://tinyurl.com/2p57zp23

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

आणखी वाचा

Comments are closed.