Abu Azmi : औरंगजेबबाबतचं वक्तव भोवलं, आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल

अबू आझमी: औरंगजेबबाबतचं वक्तव सपाचे आमदार अबू आझमी यांना चांगलंच भोवलंय. अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वागळे इस्टेट पोलिसांनी बीएनएस २९९,३०२,३५६(१),३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मरीन ड्राइव्ह परिसरात सपाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे म्हटले होते. यासह केलेल्या अन्य वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने खासदार म्हस्केंनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत काय काय म्हटलंय?

समाजवादी पक्षाचे विदयमान आमदार अबु असीम आझमी यांनी आज दि. 03/03/2025 रोजी 15:00वा. चे सुमारास महाराष्ट्र राज्याचे विधानभवनाचे परिसरात, मरीन ड्राइव्ह, मुंबई या ठिकाणी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली असून त्यांनी त्यांचे मुलाखतीमध्ये औरंगजेबाच्या राज्यकारभारावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यामध्ये त्यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे बोलुन औरंगजेबाच्या काळात भारताला ‘ सोने की चिडीया’ असे बोलले जात होते. तसेच औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जी.डी.पी. 24 टक्के होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले असे अबु आझमी बोलले. औरंगजेबाने हिंदुच्यांच देशामध्ये हिंदू धर्मियांना देवाचे दर्शन करण्यासाठी जिजिया कर लावुन हिंदुची लुट केली अशा लुटारु औरंगजेबाला अबु आझमी चांगला शासक म्हणतात. सदर मुलाखतीमध्ये अबु आझमी याने ” हमने जो पढ़ा है हमने जो पढ़ा है हमने जो देखा है औरंगजेब रहमतउल्ला अल वो कभी भी वो ऐसे शासक थे की उन्होंने कभी भी शासन का एक रूपया नही लिया अपने अपने के लिये उन्होने जो है उनकी उनके सर उनकी जो है सरकार मे भारतवर्ष की सरहद जो थी बर्मा, अफगाणीस्तान तक थी, देश सोने की चिडिया उनके जमाने में था लोगो के घरो मे सोना था इसलिए अग्रेज यहॉपर देश आया में समजता हूँ की वह शासन अच्छा कर रहे थे बाकी उनकी फौज मे हिंदु जो कमांडर हिंदु कमांडर थे यह कोई हिंदु-मुस्लीम की लडाई नही थी” असे बोलुन सकल हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देतांना अबू आझमी याने भारतीय सत्ताधारी पक्षांविशयी बोलतांना” यह जो लोग है देश के अंदर मुसलमानो को तबाह बरबाद कर देना चाहते है” असे बोलुन हिंदु-मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केली आहे. वास्तविक पाहता औरंगजेबाने हिंदुची मंदीरे तोडली, गरीबांवर अन्याय अत्याचार केले. देव देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कोणीही विसरू शकत नाही असे असतांना औरंगजेबाने 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले व धर्म परिवर्तनासाठी जुलुम जबरदस्ती केली. रयतेवर केलेले अगणित अन्याय, देव धर्माची विटंबना करणा-या औरंगजेबाचा कारभार हा भारतीय इतिहासातील काळा अध्याय आहे, असे असतांनाही व अबु आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करून हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून सत्ताधारी पक्ष देशातील मुसलमानांना बरबाद करत असल्याचे बोलुन सत्ताधारी पक्षाची बदनामी करून हिंदु-मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून माझी अबू असीम आझमी, वय- 69 वर्षे, राहणार- 4/58, कमलमेंशन, 4 था माळा, हाजर्जीनियाज अहमद आझमी मार्ग, कुलाबा, मुंबई – 400005 याचे विरोधात तक्रार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : काळीज पिळवटून टाकणारे देशमुख हत्येचे फोटो, दमानियांचा कंठ दाठला,म्हणाल्या; तरीही कराडला जेलमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट

अधिक पाहा..

Comments are closed.