परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले तर आवाज उठवायचा नाही का? अभिनेता हेमंत ढोमे यांचा सरकारला सवाल
पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर होणाऱ्या टीकेवरून मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले तर विद्यार्थ्यांनी आवाज उठवायचा नाही का?’ असा सवाल ढोमे यांनी सरकारला केला. प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संवाद साधून हा तिढा तत्काळ सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
परीक्षेच्या प्रक्रियेवरच संशय निर्माण झाला तर विद्यार्थ्यांनी शांत कसे राहायचे? पेपरफुटी आणि गैरप्रकारांचा थेट फटका या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व भविष्यातील संधींना बसतो. त्यांच्या रास्त प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्यांच्यावरच टीका करणे योग्य आहे का, असा प्रश्न ढोमे यांनी केला.
Comments are closed.