निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, अन् पैसे परत घेत योजना बंद होईल : आदित्य ठाकरे
लाडकी बहिन योजनेवर आदित्य ठाकरे : लाडकी बहीण योजनेवर माझं रीडींग जे आहे ते असं आहे की, जे अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत, किंबहुना ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, ते महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल आणि खात्यातून पैसे परत घेतील आणि त्यानंतर ही योजना बंद करून टाकतील. असे भाकीत करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेवर टीका केली आहे.
राज्यात महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अलिकडे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. अशातच लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीनं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात काही महिलांना अर्ज माघारी घेण्याबाबत ऑफलाईन पध्दतीने आणि ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत, दरम्यान या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. दरम्यान याच मुद्यावरून टीका करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण…
एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कोणत्याही क्षणी महायुतीत येऊ शकतात. यात शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी (Uday Samant) केला आहे. या दाव्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएम ने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजप आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार सुद्धा फोडायच्या विचारात आहेत. अशी बोचरी टीका ही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
त्यांच्या मेळाव्यात गायक तर आमच्या मेळाव्यात नायक
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणे सुरू झाले आहे का? जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का ? आठवा वेतन लागू करणार आहात का? असा सवाल ही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर शिंदे गटाचे मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे, असं कळलं. मात्र त्यांच्या मेळाव्यात गायक आहेत आणि आमच्या मेळाव्यात नायक असल्याचे ही ते म्हणाले.
पालकमंत्री नाही, तर जिल्ह्याचं मालक मंत्री त्यांना व्हायचंय- आदित्य ठाकरे
महायुतीमध्ये पालकमंत्री पदांच्या वाटपावरुन प्रचंड नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना पालकमंत्री नाही, मालक मंत्री त्या जिल्ह्याचं व्हायचं आहे. दादागिरीला मुख्यमंत्री झुकताय. दरम्यान माझ्या मतदारसंघातील रस्त्यांचा आढावा घेत होतो. त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. यात बोर्ड लावलेले नाहीयेत त्यामुळे या अडचणी आहेत. तर या होऊ नयेत यासाठी आम्ही आढावा घेत आहोत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.