हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं?
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, सरकारने त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडून कृषिखातं काढून घेतलं. त्यानंतर, कोकाटे यांना क्रीडा खात्याचे मंत्री केलं असून दत्तात्रय भरणेंना कृषिमंत्रीपदावर संधी देण्यात आली आहे. त्यावरुन पुन्हा एकदा सरकारवर टीका होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सर्वच मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना दिल्या असतानाही मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निधी देण्यासंदर्भाने भाषण करताना त्यांनी, पैसा सरकारचा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असे म्हणत टिपण्णी केली होती. त्यावरुन, आता आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्र्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत टोला लगावला.
देशभरात आज मैत्री दिन साजरा होत आहे, ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या रविवारी मैत्री दिन साजरा होतो. सोशल मीडियात आज सकाळपासूनच मैत्री दिनाच्या स्टोरीज, इमेजेस आणि व्हिडिओ शेअर करत आठवणी जागवल्या जात आहेत. याच मैत्री दिनाचा धागा पकडत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचल्याचं दिसून येत आहे.
हॅपी फ्रेंडशिप डे मुख्यमंत्री @CMOMaharashtra असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच, आदित्य यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारचा पैसा आहे, आपल्या काय बापाचं जातंय असे वक्तव्य केलं होतं. वसतिगृहासाठी 5 कोटी, 10 कोटी कितीही निधी मागा, मी देणार असे म्हणताना शिरसाट यांनी पैशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. त्याचवरुन, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत हॅप्पी फ्रेंडशिप डे..असे दोस्त असताना… म्हणत डिवचलं आहे.
बरं, आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर ह्यांना अर्थ खाते मिळणारच, असेही म्हटले. म्हणजे, संजय शिरसाट यांनी पैशासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांची अर्थखात्यावर वर्णी लागणार का, असेच आदित्य यांनी सूचवले आहे.
सुषमा अंधारेंकडून राजीनाम्याची मागणी
दरम्यान, सुषमा अंधारे यांनीही देखील संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरुन टीका केली होती. निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार. भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल. आता आपल्या बापाचा माल थोडीच आहे, सरकारचा पैसा आहे लुटा.. हा बेतालपणा फडणवीसजी, वाह्याद शिरसाटचा राजीनामा कधी होणार? अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
हेही वाचा
मोठी बातमी: मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली, दरवाजा तोडून बाहेर
आणखी वाचा
Comments are closed.