आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्षपद? चर्चांना पूर्णविराम देत आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीक
Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून (Shivsena) मोठी जबाबदारी दिली जाण्याची चर्चा आज (बुधवारी, ता १५) माध्यमांसह राजकीय वर्तुळात सुरू होती. सुरू असलेल्या चर्चेनुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची (Working President) धुरा दिली जाणार होती. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती, मात्र या सर्व चर्चेवरती आता खुद्द आदित्य ठाकरेंनीच पडदा टाकला आहे. (Maharashtra Politics)
Aaditya Thackeray : बातमीत काहीही तथ्य नाही आणि
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत याबाबतच्या चर्चा नाकारल्या आहेत. त्यांनी याबाबत म्हटलंय की, “आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.🚨 कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! 🚨”. त्यांना पक्षात कार्याध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्ये होत्या, त्यावर आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत पडदा टाकला आहे.
आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे.
ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.
🚨 कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! 🚨— Aaditya Thackeray (@AUThackeray) 15 एप्रिल 2026
Aaditya Thackeray : नेमकी काय होती चर्चा?
आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढणार असून त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणावर अधिकार येतील, असे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी तशाचप्रकारे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलवून तसा रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो.
Aaditya Thackeray : या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढलं राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल खासगीत नेते काय बोलता, याला अर्थ नसतो. मुंबई महानगरापलिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी आणि त्यांच्या टीमने उत्तम काम केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
Comments are closed.