Video: मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई; गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव
मुंबई: राजधानी मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाचा मनोज जारचा मुखवटा आणि राजकारण हा आत्मा असं हे आंदोलन आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे, मनोज जरागेंना तातडीने अटक करा, त्यासोबत त्यांना भेटलेल्या खासदार, आमदारांनाही अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. तसेच मुंबईबाई). पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचे पालन न करता हे आंदोलन केल्याची तक्रार गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. तसेच, अटी व शर्तींचे पालन न केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही सदावर्तेंनी केली आहे. तसेच, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे समर्थन केले आहे, त्यांनी भाषण करताना जरांगेंच्या आंदोलनावरुन राजकारण केल्याचं सांगत त्यांच्याही अटकेची मागणी सदावर्तेंनी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी ज्या प्रकारे नियमांचा आणि अटींचा भंग केला, ते बघता योग्य ती कारवाई करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन यांच्याकडे केली. त्यासाठी, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय जाधव, बजरंग आप्पा सोनवणे यांच्यावरही सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंची आंदोलनाला मुख संमती
दरम्यान, CSMT स्टेशन बाहेर रस्ता रोको करण्यात आलं, सरकारवर व्हिक्टिम कार्ड खेळता येईल यासाठी हे केलं जाताय. मनोज जरांगेचा फक्त मुखवटा आहे, राजकारण हे आंदोलनाचा आत्मा आहे. उद्धव ठाकरेंची या आंदोलनास मुख समंती आहे, त्यांच्याकडून होणारे स्वागत हे त्यांची इन्व्हॉल्व्हमेंट दाखवत आहे. उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल तर त्यांनी खरं बोलाव, ते या आंदोलनात आहेत ते सांगावं, असेही सदावर्तेंनी म्हटलं. बजरंग बाप्पा सोनावणे, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि इतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मराठी तिथे मिरवताना दिसताय. तुममे कितना दम है, या पब्लिक के पीछे से गेम खेलोगे, असे म्हणत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=rwaiixicm0a
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.