Video: तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन, सदावर्तेंचा ठाकरेंना सवाल
मुंबई : विद्याविहारमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केले होते. त्यानंतर, अधिवेशन सभागृहातही त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळाले. तर, शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही ठाकरे बंधुंनी भय्या जोशींवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून, भय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी ठाकरेंना बंधुंना डिवचलं असून भय्याजी जोशींच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. राज ठाकरे औलादी कोणत्या शाळेत शिकल्या, स्वत:ची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकवतात अशा शब्दात सदावर्तेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली.
भय्याजी जोशी यांचा भाषेवरील अभ्यास खूप मोठा आहे. या देशात कुठेही भाषेची सक्ती करणं गैर आहे, विविध भाषा हे या देशाच्या सौंदर्याचं प्रतिक असून देशाच्या सहिष्णूतेचं दर्शन त्यातून होतं, असे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. संविधानानुसार भय्यूजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही, भाषेची सक्ती करणं हे मुघली विचारांचं प्रतिक आहे, असेही सदावर्ते यांनी म्हटले. दरम्यान, सदावर्ते यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. ठाकरेंनी भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला, तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली, असे सदावर्ते यांनी म्हटलं.
मला असं वाटतय की, जेमतेम म्हणजे एखादं कार्टुनिस्ट असलेले तुम्ही कलाकार आहात, तुम्ही भाषेचे ज्ञानी नाहीत. तुम्ही लिफ्ट करुन राजकारणी झाला आहात. राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, त्याची मला किव येते. मला हे सांगा राज ठाकरे, तुमची जी मुलं आहेत, तुमच्या ज्या औलादी आहेत, त्या कोणत्या शाळेत शिकल्या? असा सवाल करत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. तुमची लेकरं, कॉन्व्हेंट, आयबीडीपीमध्ये शिकतात आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता ही भाषा शिका, ती भाषा शिका, अशा शब्दात सदावर्ते यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
https://www.youtube.com/watch?v=mhvohyj6c0y
आपल्याकडे मराठी काही किमीवर बदलत जाते
दरम्यान, उद्धव आणि राज यांनी आपली मुलं कुठल्या शाळेत शिकली याचं भान ठेवावं, मग मराठी भाषेबद्दल बोलावं. आपल्याकडे मराठीही काही किलो मीटरवर बदलत जाते. त्यामुळे राजकारण्यांनी त्याचं भांडवल करू नये, असेही सदावर्ते यांनी म्हटलं.
हेही वाचा
वडिलांना औरंगजेबाची उमपा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओचा दाखवला
अधिक पाहा..
Comments are closed.