न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकर
मणक्राव कोकेटे: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे-राठोड यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने न्याय देणे अपेक्षित असते, सबब देणे नाही, असा दावा अंजली दिघोळे यांचे वकिल आशुतोष राठोड यांनी केलाय. सत्र न्यायालयात अपेक्षित निकाल न मिळाल्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. अभिलेखवर उपलब्ध पुरावे आहेत, त्यानुसार निकाल देणे अपेक्षित होते. मात्र, सत्र न्यायालयाने असा निकाल का दिला? असा प्रश्न उपस्थित होतोय. सरकारी पक्षाने आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली नसल्याचा दावा देखील आशुतोष राठोड यांनी केलंय. कोकाटे यांनी बंदूक लायसन्ससाठी घेतलेली परवानगी, तसेच 1994 नंतरची त्यांची आर्थिक परिस्थिती न्यायालयाने लक्षात घेणं अपेक्षित होते. मात्र त्याकडं दुर्लक्ष केल्याने उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात 18 मार्चला सुनावणी होणार आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत पथदर्शी निकाल लागण्याची अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
1995 साली मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला होता. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं.यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेलं होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. या प्रकरणी कोर्टानं 20 फेब्रुवारी रोजी निकाल दिला देऊन कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. कनिष्ठ न्यायालयानं कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिलीय. माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा देताना महत्वाची टिपण्णी केली आहे. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=gwzchfmt9ce
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.