लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या

Ahilyanagar Crime : कर्जत पोलीस स्टेशनच्या (Karjat Police Station) लॉकअपचे गज कापून पाच वर्षांपूर्वी पळालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) जेरबंद केले. अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघा आरोपींना 2018 साली हसन उमर शेख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती माहिती अशी, जुलै 2018 मध्ये टरबूज व्यापारी हसन उमर शेख (50, रा.मुंबई) यांची मोहन कुंडलिक भोरे व त्याच्या चार साथीदारांनी हत्या केली. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले अक्षय रामदास राऊत (28), चंद्रकांत महादेव राऊत (30, दोन्ही रा. पारवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) व त्यांचे 3 साथीदार अशा पाच आरोपींनी 10 फेब्रुवारी 2020 रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपच्या छताचे लोखंडी गज तोडून, छतावरील कौले काढून पलायन केले होते.

या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन पुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप यांना अटक करण्यात आली होती. उर्वरीत आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना पसार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

पुण्यातील फुलगाव एमआयडीसीतून घेतले ताब्यात

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हृदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.13) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माहिती आरोपींचा शोध घेत अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत यांना पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी येथून ताब्यात घेतले. दोघांना कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

Ahilyanagar Crime : अल्पवयीन मुलाला मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, अरणगाव (ता. अहिल्यानगर) शिवारातील व्हीआरडी गेटजवळील साबुदाणा कारखाना परिसरात 7 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी साधारण 7 वाजता झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अहिल्यानगर तालुका पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी तीन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ठाणगे मळा, नेप्ती नाका येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याच्या मित्रांशी झालेल्या मागील वादाचा राग मनात धरून, संशयित आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्कीने मारहाण करत तेथेच पडलेल्या दगडाने फिर्यादीच्या डोळ्याजवळ, डोक्यावर, पाठीवर व तोंडावर मारून दुखापत केली. या मारहाणीमध्ये फिर्यादीचे दोन दात तुटले असून, संशयित आरोपींनी त्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस पोलीस अंमलदार रायचंद पालवे करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik Crime : साधूंच्या वेशात आले, ‘रक्षा’ बांधून महिलेला भुरळ घातली अन् घरातील हजारोंचा ऐवज लुटून नेला; नाशिकमधील घटनेने खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.