मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादींची थेट भाजप विरोधात लढाई, अनौपचारिक गप्पात अजित पवारांचं वक्तव्य
अजित पवार महायुतीवर : पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी (Pune Municipal Corporation Election 2026) अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections) पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई ही आता थेट भाजपच्या विरोधात असणार असल्याचे मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. पुण्यातील अनौपचारिक गप्पात अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यात महायुतीसोबत असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी पुण्यात फक्त मित्रपार्टी भाजप विरोधातच शड्डू ठोकणार असल्याची माहिती आहे.
Ajit Pawar : अजित पवारांकडून जोरदार नियोजन; भ्रष्टाचार विरोधात हल्लाबोल
पुणे मोठाशहर शिफ्टकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन करण्यात येतंहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पावारांकडून पत्रकारपरिषद घेण्यात येणार आहे. यावेळी मागच्या कारभारावर अजित पवार पत्रकार परिषददेत भाष्य करणार आहे. आज संध्याकाळी (2 जानेवारी) अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये हे पत्रकारपरिषद घेणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका मधील होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात अजित पवारांकडून हल्लाबोल होणार असल्याचेहे बोललं जात आहे. त्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार भाजपवर नेमकं काय भाष्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Pune Mahanagarpalika Election 2026 : भाजप आणि शिेंदेची युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत
गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपामुळे आणि काही कारणामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील प्रस्तावीत युती फिस्कटल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 40 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी लढणार आहे. तर पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेचे आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिेंदेची युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.