छगन भुजबळ मोठे नेते, फडणवीस-भुजबळ भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळांवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. लोकप्रतिनिधी आहेत असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळात संधी न दिल्यामुळं ते नाराज आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर भुजबळांनी हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठलं होतं. दोन दिवस त्यांनी पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा बैठका घेतल्या होत्या. तसेच नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता. त्यानंतर भुजबळ मुंबईत आले आहेत. अशातच आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर शेलार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भुजबळ भाजपमध्ये प्रवेश कराणार का? अशा देखील चर्चा सुरु आहेत. अशातच याबाबत अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिय दिली आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत असे अजित पवार म्हणाले.

फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ काय म्हणाले?

ओबीसींचे कदापी नुकसान मी होऊ देणार नाही. पण आता राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे मला आठ ते दहा दिवस तुम्ही द्या. आठ, दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तर ओबीसी नेत्यांनी थोडं शांततेने घावे, दहा-बारा दिवसात आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल त्याबाबत आपण संपूर्ण चर्चा करू, अशी विनंती देखील फडणवीस यांनी केल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

कोरेगाव भीमा इथं आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी घेतली बैठक

दरम्यान, 1 जानेवारीला कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येततात. या ठिकाणी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी आज आढावा घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पार्किंगपासून ते औषध विभागापर्यंत सगळी माहिती आज अजित पवार यांनी घेतली. यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटले, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले; अजित पवारांनी बोलणेच टाळले!

अधिक पाहा..

Comments are closed.