कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची; अजितदादा जयंतरावांना उद्देशून म्ह
जयंत पाटीलवरील अजित पवार: आवाजात प्रेमळ प्राण असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील. आम्ही काय देखणे नाही का? वाळव्याला बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना उद्देशून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, आमदार रोहित पवार हे आज (16 ऑगस्ट) इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आले होते. यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही. मला रोहितने सांगितले की, जयंत पाटील आणि मी हेलिकॉप्टरने जाणार आहे. त्यावेळी मला असं वाटलं माझं भाषण ऐकायला दोघेही नाहीत. मात्र माझं नशीब बघा की, दोघे सुद्धा भाषण ऐकायला आहेत. जयंत पाटील यांच्या आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं व्यक्तीमत्व आहे, असा उल्लेख इथे करण्यात आला. जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणं नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची, असे त्यांनी म्हटले. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नेते खळखळून हसताना दिसून आले.
अजित पवार यांचा मुलांना सल्ला
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी उपस्थित असलेले काही मुले ओरडत होती. यावरून त्यांनी मुलांना सल्ला दिला आहे. इथे बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी बसलेले आहेत. इथे कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी इथे शिकायला येतात. आज ज्ञान हे इतके महत्त्वाचे आहे की, तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठल्या कुठे जाल हे आज जगाने सिद्ध करून दाखवले आहे. आता एआय आले आहे. राज्य सरकारने बजेटमध्ये एआयसाठी 500 कोटीची तरतूद केली आहे. मी अनेकदा महाराष्ट्रात जाऊन सांगतो की, कमी पडले तर मी पुन्हा नागपूरच्या बजेट अधिवेशनात अधिकचा निधी देण्याचे काम करेल. परंतु, आपल्या मुलामुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे. परंतु, मुलांनो एक लक्षात घ्या आता तुम्ही इथे ओरडत आहात. काय-काय आवाज काढत आहात. परंतु त्यात मुलींचा आवाज नाही. फक्त मुलांचा आवाज आहे. स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांपेक्षा जास्त पुढे आले आहेत. आता टाळ्या वाजवत आहेत त्या मुलीच आहेत आणि मुलं फक्त ओरडत आहेत. तुम्ही नुसतं ओरडत रहा आणि मुली पुढे निघून जातील. नंतर त्याच मुली तुम्हाला नाकारतील. त्यामुळे ओरडणे करणे बंद करा आणि मुलींसारखंच अभ्यासात लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी यावेळी मुलांना दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=-izvfkbsfke
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.