आम्ही गोxx खेळतो का?, तुम्ही काम करतात त्यांचीच माxx…; अजित पवार संतापले, VIDEO
अजित पवार धाराशिव पाऊस: सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे (Flood In Marathwada) नुकसान झालेल्या भागात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पाहणी करत आहेत. काल (24 सप्टेंबर) अजित पवारांनी भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची जवळून पाहणी केली. अजित पवारांनी यावेळी गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. शेतकऱ्यांची शेतं, नुकसानग्रस्त घरं आणि उध्वस्त झालेला संसार अजित पवारांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. यावेळी गावकऱ्यांना धीर देत आपलं सरकार शक्य त्या मार्गानं मदत करण्यासाठी ठोस पावलं उचलत असण्याचा विश्वासही अजित पवारांनी दिला. यादरम्यान, एका तरुणावर अजित पवार संतापल्याचे दिसून आले.
परांड्यात पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) एका तरुणावर भडकले. अजित पवार गावकऱ्यांची संवाद साधताना एका तरुणाने कर्जमाफीबाबत विचारले. यावर याला द्या रे मुख्यमंत्रीपद, सगळी सोंग करता येतात पैशांचं सोंग करता येत नाही, असं अजित पवारांनी सांगितले. आम्ही इथं काय गोट्या खेळायला आलो का? असंही अजित पवार म्हणाले. मी सकाळी 6 वाजल्यापासून दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, जे काम करतात, त्यांचीच तुम्ही मारा…, असं म्हणत अजित पवारांनी तरुणाला सुनावले.
पिकांचे पंचनामे जलद गतीनं पूर्ण करून मदत करणार- अजित पवार (Ajit Pawar On Dharashiv Flood)
अजित पवार म्हणाले की, पूरामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे याची जाणीव मला आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पिकांचे पंचनामे जलद गतीनं पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्या, असे निर्देश देखील अजित पवारांनी दिले.
आज भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची जवळून पाहणी केली. गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. शेतकऱ्यांची शेतं, नुकसानग्रस्त घरं आणि उध्वस्त झालेला संसार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. यावेळी गावकऱ्यांना धीर देत आपलं सरकार शक्य… pic.twitter.com/mndpfo06ls
– अजित पवार (@ajitpawarspeaks) 24 सप्टेंबर, 2025
मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार- (Flood In Marathwada)
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा (Maharashtra Heavy Rain) इशारा देण्यात आलाय. पुढील 5 दिवसांत राज्यातील सर्वच भागात धुंवाधार पाऊसाचा इशारा आहे. विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाड्यातील काही भागात आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. मराठवाड्यात 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे.
अजित पवारांचा संताप, बीड दौऱ्यात काय घडलं?, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=krr2m32zrus
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.