अजित पवारांसाठीची इव्हेंट कंपनी पुन्हा सक्रिय, नेत्यांना परवानगीशिवाय न बोलण्याची सूचना, नरेश अ
अजित पवार राष्ट्रवादी : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला होता. राज्यभरातील 288 विधानसभा जागांपैकी महायुतीला 236 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला होता. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाची रणनीती ‘डिझाईन बॉक्स’ (design boxed.com) या पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीने सांभाळली होती. आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांवर आता थेट ‘डिझाईन बॉक्स’ची नजर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार राष्ट्रवादी : राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आता ‘डिझाईन बॉक्स’ची नजर
स्थानिक निवडणुका तोंडावर असताना माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची आणि प्रवक्त्यांची कोंडी होणार आहे. जोपर्यंत डिझाईन बॉक्सकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत बोलता येत नसल्याने नेत्यांची आणि प्रवक्त्यांची कोंडी होतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार? हे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राजकीय स्ट्रॅटेजिस्ट नरेश अरोरा ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकी पाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील नरेश अरोरा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय रणनीती ठरवणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Who is Naresh Arora: कोण आहेत नरेश अरोरा?
नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिलं आहे. राजकीय ब्रँडिंग, संदेश व्यवस्थापन आणि इमेज मेकओव्हर यात त्यांचा हातखंडा आहे. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला नव्याने उभे करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या टीमने घेतली होती. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे गुलाबी जॅकेटमध्ये दिसले होते. अजित पवार यांच्यासाठी ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ नरेश अरोरा यांनीच राबवले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे यश मिळाल्याचे दिसून आले होते. आता नरेश अरोरा हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी रणनीती आखणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.