मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा

पुणे : बारामतीचा चेअरमन मीच असेल तर साखर आयुक्त काय करेल, सहकार मंत्री काय करेल? मी चेअरमन झालो तर योग्य पद्धतीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावेल. डायरेक्टर चुकला तर मी आहे, मी काय करायचं ते करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती (Baramati) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन कारखाना सभासदांना केलं आहे. तसेच, अजित पवारला (Ajit Pawar) पैशाची गरज नाही, बाप जाद्याच्या कृपेने बर चाललं आहे, मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का 85 वर्षांचा चांगले काम करेल? असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला. कारखाना निवडणुकीतील विरोधक असलेल्या 85 वर्षे वयाच्या चंद्रराव तावरे यांना अजित पवारांनी टोला लगावला.

एक महिला माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की, एक व्यक्ती मला त्रास देतो. मी तिला सांगितले बिनधास्त घरी जा, तो उद्या तुझी माफी मागेल. मी शब्द फिरवला तर मला विधानसभेला जाब विचारा. मी सांगितले होत ना सोमेश्वर कारखाना बाहेर नाही काढला तर फॉर्म भरणार नाही. मी सांगितले होतं ना. त्यानुसाार, आधी कारखाना बाहेर काढला, मगच फॉर्म भरला. मी पाच वर्षे भत्ता पण घेणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारला पैशाची गरज नाही, बाप जाद्याच्या कृपेने बर चाललं आहे, मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का 85 वर्षांचा चांगले काम करेल? असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना टोला लगावला. कारखाना निवडणुकीतील विरोधक असलेल्या 85 वर्षे वयाच्या चंद्रराव तावरे यांना अजित पवारांनी लक्ष्य केलं. यापूर्वी शरद पवारांच्या वयाच्या मुद्दाही अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपस्थित केला होता. माळेगाव नगर पंचायतीसाठी गेल्या चार वर्षात 350 कोटी दिले. एक्ससाईज डिपार्टमेंट कोण? अजित पवार आहे, त्याच्याच हातात आहे. त्याला विनंती करू, अरे सगळं आपल्या हातात आहे. सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला अजित पवारची मान खाली घालायची की ताट ठेवायची तुमच्या हातात आहे, असे म्हणत अजित पवारांनी माळेगाव सहकारी कारखान्यात पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन केलं.

माझी इच्छा होती छत्रपती कारखान्याचे चेअरमन व्हायचं होता. आता, 5 वर्षे अजित पवार चेअरमन असणार आहे. जर सासुरवाडीला जाऊन कारखाना चालवतो, तर माझं मला जमत नाही का? हे तर माझं बाळ आहे. ते म्हणतात ब वर्गातील एक जागा त्यांची येईल. बाकी आमच्या येतील अरे आम्ही गोट्या खेळायला आलोय का? मी कुणासमोर सहसा हात जोडत नाही. पण तुमच्या समोर हात जोडतोय, कारण तुम्ही मतदार आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कामाचा माणूस आहे. मी स्वार्थी नाही, मी मतलबी नाही. जेवढं मला भरभरून देता येईल त्यासाठी मी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. अजित पवार चेअरमन होण्यासाठी हे बोर्ड आलं पाहिजे, माझ्यासाठी मतभेद बाजूला ठेवा अशी भावनिक सादही अजित पवारांनी घातली.

हेही वाचा

नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप

आणखी वाचा

Comments are closed.