मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फ

प्रकाश शेंडेज: मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात केलेल्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीस मान्यता देणारा जीआर जारी केला होता . या निर्णयामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे . दरम्यान सरकारच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल होत असताना दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे . मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले .अन ओबीसींना 25 वर्षात अडीच हजार कोटी दिले .अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलाय . तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या भूमिकेवरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली .

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे . दसऱ्यानंतर ओबीसी समाजाकडून मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .आठ किंवा 9 ऑक्टोबरला हा मोर्चा पार पडेल असं कळतंय . OBC नेत्यांच्या बैठकीत तारखा निश्चित करण्यात येतील .  या मोर्चावरून ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी या मोर्चाच्या अजेंडा काय ? अशी भूमिका घेतल्यामुळे  ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केलीय .

काय म्हणाले प्रकाश शेंडगे ?

‘आज एक आणि उद्या एक आमची याचिका दाखल होतं आहे. समीर भुजबळ ही याचिका दाखल करत आहे. श्रीहरी आणे याच काम पाहत आहेत . आज ऑनलाइन ओबीसी नेते बैठक होत आहे. या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित असतील. दसऱ्यानंतर होणाऱ्या मोर्चाची तारीख या बैठकीत निश्चित होईल. ८ किंवा ९ ऑक्टोबरला मोर्चा होण्याची शक्यताय .

‘अजित पवार एकाच समाजाचे नेते आहेत का? ‘

अजित पवार केवळ एका समाजाचे नेते आहेत का? ते अर्थमंत्री मागील ३ वर्ष आहेत. खजान्याची चावी त्यांच्याकडे आहे त्यांनी ३ वर्षात मराठा समाजाला २५ हजार कोटी दिले आहेत आणि मागील २५ वर्षात फकत अडीच हजार कोटी ओबीसी समाजाला मिळाले आहेत .आम्ही आज सर्वांना विनंती करत आहोत की ओबीसीतील कोणत्याही समाजाने पीआयएल दाखल करू नये कारण आम्ही रिट पिटिशन दाखल करत आहोत . मराठा आंदोलन सुरू असताना अनेक आमदार मंत्री त्यांच्या स्टेजवर पहिला मिळाले मोर्चात देखील चालत होते त्यामुळे आता ओबीसी मंत्र्यांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावे छगन भुजबळ यांनी महामोर्चात यावे असे आवाहन त्यांनी केले .

तायवाडे यांच्या भूमिकेवर नाराजी

‘ सगे सोयरे चा निर्णय जमा घेतला जात होता तेव्हा सुद्धा तायवडेंनी हीच भूमिका घेतली होती . समाजभावनेमध्ये हा शासन निर्णय आरक्षणाला ओबीसीच्या धक्का लावणार आहे..तायवाडे यांनी एक भूमिका आता घेतली आहे ते आता भूमिका बदलतील असे मला वाटत नाही .सगळ्या ओबीसी नेत्यांना विनंती आहे की वेगवेगळ्या भूमिका मांडण्यापेक्षा एकत्रित मिळून चर्चा करा . तायवाडे यांना आधीच्या ओबीसी बैठकीला सुद्धा भुजबळ यांनी बोलवलं होतं… त्यावेळी त्यांनी सांगितले की नागपूर मध्ये आंदोलन सुरू आहे येता येणार नाही .तायवाडे अशी भूमिका घेतील वाटलं नव्हतं . ‘ असेही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले .

तायवाडेंची भूमिका काय ?

ओबीसी समाजाच्या महामोर्च्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून स्वागत आहे. मात्र मोर्च्याचा अजेंडा काय? कोणत्या मागण्या साठी हा मोर्च्या निघणार आहे. हे आयोजकांनी स्पस्ट करावे अशी मागणी  बबनराव तायवाडे यांनी केली आहे.

नविन शासन आदेशाने ओबीसी समाजाचे कसे नुकसान होत आहे ? हे छगन भुजबळ किंवा महामोर्च्यांच्या आयोजकांनी स्पष्ट करावे . त्यांची ती भूमिका समाजहिताची असल्यास आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, महामोर्च्यात सहभागी होऊ भूमिका बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे.

मंत्रिमंडळाच्या उप समितीत बैठकीत   राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांवर चर्चा झाली , मात्र छगन भुजबळ यांना नवीन शासन आदेशाला घेऊन जे आक्षेप होते त्यावर त्यांना आपली बाजू मांडता आली असती, मात्र त्यांनी ती बाजू मांडली ? अशी माहिती कुठे पुढे आली नसल्याचे देखील बबनराव तायवाडे म्हणाले .

आणखी वाचा

Comments are closed.