पवारांच्या कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी?; श्रीनिवास पवारही पुतण्या जयच्या लग्नाला न
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे धाकटे सुपूत्र जय पवार (Jay Pawar) यांचं येत्या आठवड्यात लग्नसोहळ्याचं पर्व बहरीनमध्ये पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होणार असून या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
Jay Pawar Rutuja Patil: अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी बेंगलोरला एका विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. नवविवाहित दांपत्य युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी बहरीन येथे पार पडणाऱ्या जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या लग्नसोहळ्यालाही अजित पवार देखील अनुपस्थित होते. नुकताच पार पडलेल्या युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळ्याला अजित पवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे पोहोचू शकले नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांना संसदीय कामकाज आहे, त्यामुळे त्यांच्या जाण्याची शक्यता कमी आहे, शरद पवार लांबचा प्रवास करत नाहीत. तर प्रफुल पटेल देखील जाणार नाहीत, त्यांची फॅमिली जाणार नाही, सुनील तटकरे देखील जाणार नाहीत त्यांची फॅमिली जाणार आहे, सुप्रिया सुळे, शरद पवार, प्रतिभा पवार जाणार नाहीत.
Jay Pawar Rutuja Patil: लग्नसोहळ्याला फक्त ४०० पाहुण्यांना आमंत्रण
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नसोहळ्याला फक्त ४०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.
जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका एबीपी माझाच्या हाती लागली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचे पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
४ डिसेंबर – मेहेंदी
५ डिसेंबर – हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा
६ डिसेंबर – संगीत
७ डिसेंबर – स्वागत समारंभ
या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
Jay Pawar Rutuja Patil: नुकताच पार पडला युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा भव्य विवाह सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि तनिष्का कुलकर्णी (Tanishka Kulkarni) यांचा भव्य विवाह सोहळा (३० नोव्हेंबर) रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ सेंटर येथे संपन्न झाला. युगेंद्र यांच्या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. युगेंद्र-तनिष्का यांचा विवाह हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला.
आणखी वाचा
Comments are closed.