दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
अकोला : राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत असताना आता अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालं आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची माहिती आहे. या अपहरणाप्रकरणी अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिस ठाण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पोलिस ठाण्यात पोचले आहे. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. अपहरणाच्या या प्रकारामुळं अकोला शहरात आणि कृषी नगर परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मुलीच्या शोधार्थ सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथक गठीत करण्यात आले असून मुलीच्या शोधात पथक रवाना झाले आहेत. अद्यापपर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
अमोल मिटकरींच्या पोलिसांना सूचना
अकोल्यातल्या कृषी नगर भागात असलेल्या गजबजलेल्या वस्तीतून मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास या 13 वर्षीय मुलीच अपहरण झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक बच्चनसिंग तसेच ठाणेदार जयवंत सातव यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
संशयितांची नावे पोलिसांकडे
दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी काही संशयितांची त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. काही दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथली पाहाणी पोलिसांनी केली असल्याची माहिती पोलिस अधिकारी जयवंत सातव यांनी दिली.
दरम्यान, अकोला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पालक आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा अकोला पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि वंचित आघाडीकडून होत आहे.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.