धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा; अकोल्यातील घटना
गुन्हा: अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येतीये.. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय.. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे.. (Akola Crime) राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. किरकोळकरणातून मारहाण, दिवसाढवळ्या होणारे खून, दहशत वाजवण्याचा प्रयत्न, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अकोल्यात पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला रविवारी रात्री ( 16 मार्च) चोरट्यांनी फोडून काढले. बेदम मारहाण तर केलीच पण त्याचा चेहरा दगडाने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे. या व्यक्तीची सध्या प्रकृती चिंताजनक आहे.
नक्की घडले काय?
अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता… त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढलाय.. काल रात्री(16मार्च )उशिरा अकोला रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली.. सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली.. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले असून रवाना केले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.
मुंबईत दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून
राजधानी मुंबईत नेहमीच गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरून जातं, कधी भाईगिरी, कधी अंमली पदार्थ तर कधी हत्येच्या घटनांनी मुंबईबाई). महाराष्ट्राचं लक्ष वेधते. आता, येथील मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरात 75 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या वयोवृद्धाचा मृतदेह झाडाझुडुपात आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी (Police) गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणी नायगावमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीसह तिच्या 17 वर्षीय मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.