‘करिष्मा, तेरी याद बहुत सताती हैं, प्रेयसीनं धोका दिला अन्…; 18 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर
अकोला: अकोला जिल्ह्यातील काटीपाटी दोनवाडा शेतशिवारात गर्लफ्रेंडने (Akola Crime News) धोका दिल्याच्या मानसिक धक्क्यातून 18 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ (Akola Crime News) पोस्ट करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा पालवी असे या तरुणाचे नाव असून, त्याने ‘करिष्मा, तेरी याद बहुत सताती रही थी… बाय… नहीं जी सकते तेरे बिना’ असा मजकूर लिहीत विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता.(Akola Crime News)
हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांच्या सायबर पथकाने तत्काळ दहीहंडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधून संबंधित तरुणाबाबत माहिती दिली. त्यानंतर दहीहंडा पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत काटीपाटी दोनवाडा परिसरात तरुणाचा शोध घेतला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कृष्णा पालवी याला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(Akola Crime News)
प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातील वाद आणि गर्लफ्रेंडकडून धोका मिळाल्याच्या कारणातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दहीहंडा पोलीस करत असून, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा संवेदनशील घटनांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.(Akola Crime News)
Nagpur Crime News: नागपूरात एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या
नागपूर (Nagpur) शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन (Mankapur Police Station) हद्दीतील गोधणी येथून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राची खापेकर असे मृत तरुणीचे नाव असून, शेखर ढोरे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी शेखर हा विवाहित असून मृत प्राचीचा शेजारी होता.
प्राची खापेकर ही गोधणी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत कुटुंबासह राहत होती. ती बी.ए.चे शिक्षण घेत होती. त्याचसोबत आरोपी शेखर ढोरे याच्या पत्नीबरोबर शिवणकामाचे कामही करत होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखरने प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हेतू लक्षात येताच प्राचीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.
Nagpur Crime News: मृतदेह फॅनला लटकावला अन्…
हीच गोष्ट शेखरला सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी, प्राचीच्या घरात कोणीही नसताना तो तिच्या घरी आला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबून तिची हत्या केली. प्राचीचा मृत्यू झाल्याची खात्री होताच, शेखरने ओढणीचा फास बनवून तिचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकावला आणि आत्महत्येचा बनाव रचत घटनास्थळावरून फरार झाला.
आणखी वाचा
Comments are closed.