भाजपनं माजी महापौरांचं तिकीट कापलं, विजय इंगळेंनी ठाकरेंची मशाल हाती घेत विजय मिळवला

अकोला :‘भाजपने तिकीट कापलेले चार टर्मचे नगरसेवक विजय इंगळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग 20 मध्ये विजयी झाले आहेत. विजयानंतर इंगळेंनी भाजपचे माजी महापौर विजय अग्रवालांवर गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यात भाजपचा पराभव विजय अग्रवालांनीच घडवून आणल्याचा गंभीर आरोप विजय इंगळे यांनी केला आहे.

Akola Politics : विजय इंगळे काय म्हणाले?

काल अकोला महापालिकेचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपचं संख्याबळ 10 ने कमी होत 48 वरून 38 वर आलंय. यामुळे अकोला महापालिकेत सत्तेसाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. अकोल्यातील  निकालांपैकी प्रभाग क्रमांक 20 अ मधील लढत लक्षवेधी होती. भाजपने या ठिकाणी त्यांचे चार टर्म नगरसेवक असलेल्या विजय इंगळे यांचं तिकीट कापलं होतं.

भाजपने या ठिकाणी विद्युत बिल वाटप करणाऱ्या मंगेश झिने या युवकाला तिकीट दिलं होतंय.‌ भाजपने तिकीट कापल्यानंतर विजय इंगळे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत विजय इंगळे यांनी मंगेश झिने यांचा तब्बल 1839 मतांनी पराभव करीत पाचव्यांदा विजयी पताका फडकावली. विजय इंगळे यांच्यासोबत या प्रभागात ठाकरे गटाच्या सुरेखा काळे याही विजयी झाल्या आहेत. ठाकरे गटाचे इतर दोन उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले आहेत. आज वाढदिवस असलेल्या विजय इंगळे यांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मतदारांनी विजयाची मोठी भेट दिली आहे.

दरम्यान, या विजयानंतर विजय इंगळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.भाजपच्या जागा 48 वरून 38 वर का आल्यात? अकोल्यातील भाजपाच्या पराभवाला पक्षाचे माजी महापौर विजय अग्रवालच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी विजय अग्रवाल यांनी ताकद लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विजय इंगळे यांनी पक्षाने जरी तिकिट कापलं तरी जनता माझ्यासोबत होती. हा विजय माझ्या प्रभागातील जनतेचा आहे.  भाजपने पूर्ण ताकद लावल्यानंतरही माझा विजय झाला आहे. भाजप 48 वरून 38 वर कसा आला? हा प्रश्न आहे. अकोल्यातील भाजपच्या पराभवाला विजय अग्रवाल कारणीभूत आहेत. त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केलेत, असं विजय इंगळे म्हणाले.

अकोला महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप :38
काँग्रेस :21
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 06
वंचित बहुजन आघाडी : 05
राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
महानगर विकास समिती : 01
अपक्ष :01
शिवसेना :01

Rupali Patil Thombare: आक्रमक होत रूपाली ठोंबरेंचा मतमोजणी केंद्रावर गोंधळ; जाळीवर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न, आता स्पष्टीकरण देत म्हणाल्या…

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.