‘भाजपला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू’ ; भाजपच्या माजी महानगराध्यक्षाचा खळबळजनक आरोप

अकोला बातम्या : अकोल्यात भाजपला ‘मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे यांनी केलाय. ते भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेत (Akola News) बोलत होते. या सहविचारसभेत भाजपचे 7 माजी नगरसेवक आणि भाजपचे (BJP) नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते. हे सर्वजण महापालिकेत नवी आघाडी स्थापन करणार होते. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाहीये. त्यामुळे ‘आम्हाला निवडून न दिल्यास तुमच्या लाडक्या बहिणीचा निधी बंद होईल, असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरु असल्याचे ओळंबे म्हणालेय.

Ashok Olambe : 500 कोटींचा विकास निधी धनाड्य आणि जनप्रतिनिधीच्या लेआउटकडे वळवला

दरम्यान, 500 कोटींच्या विकास निधीवरून त्यांनी भाजपवर ताशेरे ओढलेहे. महापालिकेच्या वाढीव भागासाठी आलेला पाचशे कोटीचा निधी जंगल भागात वळवल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्या ठिकाणी कुणीही राहत नाही, तिथे लेआऊट पडले आहे, ते धनाढ्य आणि जनप्रतिनिधीचे असून तिथेच भूमिगत्यामुळे गटार योजनेच्या कामाचे या निधीतून काम सुरू असल्याचा आरोप ओळंबे यांनी केलाय. ओळंबे महापालिका निवडणूक काळात अनेक नव्या आरोपांनी पक्षाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

BJP : भाजपचा भंडाऱ्यात नवा नारा, बटोगे तो कटोंगे नाही तर…चुकीच्या माणसाला व्होट दिल्यास फसोंगे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं नारा दिला होता…बटोगे तो कटोगे…! आता भाजपनं बटोगे तो फसोगे असा नवा नारा देत मतदारांना मतदान करताना इतर पक्षाच्या फसव्या उमेदवारांच्या प्रलोभनाला फसू नका आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवाराला विजय करा, असं आवाहन भाजप नेते परीणय फुके यांनी केलं.

भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 12 आणि 15 ची निवडणूक 20 डिसेंबरला होत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये घेतलेल्या नुक्कड सभेत वरील प्रतिपादन केलं. या प्रभागात भाजपच्या दोघांनी पक्षाच्या विरोधात जात दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेत भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक रिंगणात उभे आहेत. अशांना भाजप नेते परिणय फुकेंनी चांगलेच खडेबोल सुनावले. केवळ उमेदवारीसाठी भाजप पक्षाशी गद्दारी करणाऱ्या अशा उमेदवारांपासून आता मतदारांनी जागृत राहावं आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्याच अधिकृत उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करावं, असं आवाहन भाजपा नेते परीणय फुके यांनी केलं. बटोगे तो फसोगे या भाजपच्या नव्या नाऱ्याची भंडाऱ्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.