पाच वर्षात पाच वेळा पक्षांतर, माजी आमदार बळीराम सिरस्कारांचा विक्रम, सेनेतून भाजपमध्ये प्रवेश


अकोला बातम्या : अकोला (Akola)  जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार (Baliram Sirskar) यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकिटासाठी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला होता.‌ आज पु्न्हा त्यांनी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतलाय. यानिमित्ताने 5 वर्षात वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि परत भाजप असं पाच पक्षांच्या पक्षांतराचं ‘पंचक’ पूर्ण केलं आहे.

निवडणूक लावल्यानंतर एक वेळाही शिंदेंच्या पक्षाच्या बैठकीला गेलो नाही

या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी केलेली वक्तव्य महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. प्रवेशवेळी बोलतांना माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लावल्यानंतर एक वेळाही शिंदेंच्या पक्षाच्या बैठकीला गेलो नसल्याचं अभिमानानं सांगितलं. तर भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी बळीराम सिरस्कार यांची इच्छा नसतांनाही त्यांना शिंदेंच्या तिकिटावर बाळापूरातून लढावं लागल्याचं म्हटलंय. शिंदेंनी बाळापुरात भाजपातून उमेदवार आयात करतांना आपल्याच पक्षातील अनेक इच्छुकांवर अन्याय केल्याचं यामुळे बोललं जातंय.  बळीराम सिरस्कार हे 2009 ते  2014 आणि 2014 ते 2019 अशी दोन टर्म वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार होते. 2024 च्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी झाले आहेत.

बळीराम सिरस्कार यांनी गेल्या पाच वर्षात पाच पक्ष बदललेले आहेत

दरम्यान, राजकीय कोलांटउड्या मारणाऱ्या माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बळीराम सिरस्कार यांनी गेल्या पाच वर्षात पाच पक्ष बदललेले आहेत.  5 वर्षात वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि परत भाजप असं पाच पक्षांच्या पक्षांतराचं ‘पंचक’ पूर्ण केलं आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  सरवच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दौरे सुरु केले आहेत. अशा स्थिती मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात प्रवेश होताना दिसत आहे. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या पक्षप्रवेशाने अकोल्याच भाजपची ताकद वाढणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.