माझ्या मुलीला न्यूड फोटो पाठवला; अक्षय कुमारने हादरवणारा प्रसंग सांगितला, नेमकं काय घडलं?


सायबर गुन्हेगारीवरील अक्षय कुमार मुंबई: राज्यात होणारे ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर सुरक्षिततेच्या (Cyber Crime) दृष्टीने गृह विभागाकडून महाराष्ट्रात ‘सायबर जागरूकता महिना’ साजरा करण्यात आला. सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025 उदघाटन कार्यक्रम’ येथे ‘सायबर योद्धा’ या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar), अभिनेत्री राणी मुखर्जी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने एक हादरवणारा प्रसंग सांगितला.

अक्षय कुमार काय म्हणाला? (Akshay Kumar On Cyber Crime)

मी अनेक गोष्टी लिहून आणल्या होत्या. मात्र माझ्या आधी अनेक जण बोललेत तर बोलायला काहीच उरलं नाही. मात्र, मला काही सांगायचं आहे जी एक घटना माझ्यासोबत घडली. माझी मुलगी एक ऑनलाइन गेम मोबाइलवर खेळत होती. आणि मॅसेजेस येत होते धन्यवाद, मस्त, चांगलं खेळलात आणि एक मॅसेज आला तुम्ही कुठून आहात?, मग एक मॅसेज आलात पुरुष आहात की महिला?…मग समोरुन मॅसेज आला न्यूड फोटो पाठवा. तिने फोन बंद केला आणि तिच्या आईला सांगितलं. इथून ह्या सर्व गोष्टी सुरु होतात. इथूनच सायबर क्राइमची सुरुवात होते, असं अक्षय कुमार म्हणाला.

शाळेत एक तास सायबर क्षेत्राचा असावा- अक्षय कुमार

अनेक गोष्टी आणि केसेस तुम्ही स्वतः बघता. मुख्यमंत्री इथे बसले आहेत.  शाळेत इतिहास, भूगोल, गणित शिकतो. मात्र, सायबर क्षेत्रात जातो तेव्हा काहीच माहिती नसतं. अशात, माझी विनंती आहे, शाळांमध्ये 7 वी ते 10 वी एक तास सायबर क्षेत्राचा असावा. स्ट्रीट क्राइमपेक्षा सायबर क्राइम वाढलं आहे, असं अक्षय कुमारने सांगितलं.

अक्षय कुमारच्या मुलीवर सायबर हल्ला, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=y-kyuvvvfsr8

संबंधित बातमी:

Akshay Kumar 100 Crore Movies: केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर

आणखी वाचा

Comments are closed.