प्रकल्प सल्लागार नेमण्याचे कोटय़वधीचे चार प्रस्ताव रोखले, पालिकेत सर्वपक्षीय आक्रमक
पालिकेच्या बहुतांशी प्रकल्पांसाठी प्रशासनाकडून सल्लागारावर कोटय़वधी रुपये उधळले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा संबंधित सल्लागार नेमण्याचे चार प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी रोखले.
भांडुप संकुल येथे प्रतिदिन 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलउदंचन केंद्र उभारणे, गुंदवली जलबोगद्यापासून 3000 मिमी व्यासाची जलवाहिनी उभारणीचा आराखडा तयार करणे आणि मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नेमणे अशा प्रस्तावांचा यात समावेश होता. यावेळी शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी सेवानिवृत्त अभियंत्यांच्या अनुभवाचा उपयोग करून त्यांना पॅनेलवर घ्यावे, अशी सूचना केली. आमच्या कारकिर्दीत गुंदवली बोगद्याचा अत्यंत अवघड पहिला टप्पा पूर्ण करताना सल्लागाराची आवश्यकता भासली नव्हती, असे ते म्हणाले. सल्लागारांवर आतापर्यंत किती खर्च झाला याची माहिती सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली.
Comments are closed.