AI वर 30 लाख कोटींचा खर्च, 30 हजार नोकऱ्यांवर कुऱ्हाड; अमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांचा संताप

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली अमेझॉन सध्या एका विचित्र संकटात सापडली आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे, तर दुसरीकडे हजारो कर्मचारी आपल्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे अमेझॉनला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. AI मुळे ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे. त्यातच कंपनी एआयवर ३० लाख कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या जगभरात एआयबद्दल उत्साह नाही, पण अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप उफाळून येत आहे. असेच काहीसे अमेझॉनच्या बाबतीतही घडत आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे, पण आता ती कंपनी एआयवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे. त्यामुळे त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे.

ॲमेझॉनने अंदाजे ३०,००० नोकऱ्या कमी केल्या आहेत. कंपनीने AI पायाभूत सुविधा, डेटा सेंटर्स आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरूच ठेवली आहे. यामुळेच आता कंपनीमध्ये आंदोलने सुरू झाली आहेत. अमेरिकेतील सिएटल येथे सिटी कौन्सिलच्या सुनावणीत, काही ॲमेझॉन अभियंत्यांनी उघडपणे स्वतःच्याच कंपनीविरोधात आवाज उठवला. कंपनी मोठे एआय डेटा सेंटर्स उभारत असताना कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

कंपनी २०२६ पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पायाभूत सुविधांमध्ये २०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. ३०,००० लोकांना कामावरून काढून टाकल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे एकूण कर्मचाऱ्यांच्या ८.६% आहे, जे खूप जास्त आहे. या अभियंत्यांनी केवळ नोकरकपातीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर डेटा सेंटर्सबद्दलही चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, हे डेटा सेंटर्स अतिरिक्त वीज आणि संसाधने वापरतात, ज्यामुळे पर्यावरण आणि स्थानिक समुदायांवर परिणाम होतो.

केवळ ॲमेझॉनच नाही, तर संपूर्ण टेक इंडस्ट्री सध्या एआयच्या (AI) शर्यतीत उतरली आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि एनव्हिडियासारख्या कंपन्याही या शर्यतीत आहेत. प्रत्येक कंपनीला एआयमध्ये आघाडीवर राहायचे आहे आणि हे साध्य करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. या शर्यतीची किंमत कर्मचारी आणि जनतेला मोजावी लागत आहे. त्यामुळे याविरोधात आता आंदोलने होत आहेत.

अमेरिका आणि युरोपमधील अनेक ठिकाणी एआय आणि डेटा सेंटर्सविरोधात आंदोलने झाली आहेत. लोकांना भीती आहे की एआयमुळे नोकऱ्या जातील आणि पर्यावरणावर मोठा ताण येईल. ॲमेझॉनमध्ये कंपनीतूनच याला विरोध होत आहे. कर्मचारी सहसा आपल्या कंपनीच्या निर्णयांवर जाहीरपणे प्रश्न विचारत नाहीत, पण ही परिस्थिती वेगळी आहे.

तज्ञांच्या मते, एआय (AI) वरील प्रचंड खर्च अद्याप कंपन्यांसाठी महसुलात रूपांतरित होत नाहीये. याचा अर्थ असा की, कंपन्या सुरुवातीला पैसे गुंतवत आहेत, पण त्यांना त्याचे फायदे लगेच दिसत नाहीत. परिणामी, खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र संतपाची लाट उसळली आहे.

Comments are closed.