पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली; स्टँप ड्युटी फक्त 500 रुपये दिली, अंबादा
पवारांच्या भागाचे मठाधिपती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा पार्थ पवारांवर (Parth Pawar) शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा दावाही दानवेंनी केलाय. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? (Ambadas Danve On Parth Pawar)
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल, असं अंबादास दानवे पोस्टद्वारे म्हणाले.
दुसरीबाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्रअसं अंबादास दानवेंनी एक्सवर पोस्ट करुन सांगितले.
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
— अंबादास दानवे (@iambadasdanve) ५ नोव्हेंबर २०२५
अंजली दमानिया काय म्हणाल्या? (Anjali Damania On Parth Pawar)
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार पोराच्या 1804 कोटींचे डील. त्यावर 126 कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील 300 कोटीचे दाखवून, त्यावरचे 21 कोटी देखील माफ…ही माफी फुकट नव्हती का?, असा सवाल समाजसेविका अंजली दमानिया म्हणाल्या.
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार —
पण पोराच्या १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ !
ही माफी फुकट नव्हती का? pic.twitter.com/3YJuXiWPd8
– श्रीमती अंजली दमानिया (@anjali_damania) ५ नोव्हेंबर २०२५
आणखी वाचा
Comments are closed.