खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही : अंबादास दानवे
राजदूत दानवे: एखाद्याला तिकिट मिळालं नाही त्यावरुन ते बोलले असतील तर त्यात विशेष काही नाही. असे वाद सर्व पक्षात होतात, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले. आमच्यात कोणताही वाद नाही, ते काही गोष्टी बोलले असतील. वेळ कमी आहे, मी खैरे साहेबांप्रमाणे बोलावं की न बोलावं, यापेक्षा खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट गेलं असल्याचे दानवे म्हणाले.
भाजपने होलसेल भर्ती करुन घेतलीय
एक एक उमेदवार ठरवताना नाकी नऊ येतात सर्व पक्षातही परिस्थिती असते. 10 वर्ष आमच्याकडे निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळं इच्छुकांची गर्दी मोठी आहे. पक्षाच्या प्रचाराची भूमिका वाटून दिली आहे. कोणी न गेल्याने निवडणूक होणार नाही का? असा सवाल दानवे यंनी केला. डॉ. काकडे यांच्याबाबत जे झालं त्यावर फार काही बोलणार नाही. पक्षात सक्षम लोकं असताना बाहेरच्या लोकांना का घ्यायचं? भाजपने आता काही पाहिलं नाही होलसेल भर्ती करून घेतल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळे परंपरागत काम करणाऱ्यांना डावललं जातं. त्यानंतर मग कार्यकर्त्यांच्या भावना यांना सामोरे जावे लागते असे दानवे म्हणाले.
मुंबई वगळता भाजपला कुठेही युती करायचीच नव्हती
भाजपने साम दाम दंड भेद अशा पद्धतीने पक्षात घेतलं आहे. काँग्रेसविषयी फार काही बोलणार नाही. महाराष्ट्रात अजूनही आम्ही महाविकास आघाडीत आहोत. शिंदे काही नाराज नाही, भाजपचा खरा चेहरा शिंदेंनी ओळखला आहे. मुंबई वगळता भाजपला कुठेही युती करायचीच नव्हती असे दानवे म्हणाले. कृपाशंकर सिंग माजी मंत्री एका काळचे काँग्रेसचे नेते आता ते बाहेरचा माणूस महापौर करायचा आहे. ग्रामपचायतीच्या निवडणुकीलाही मोदी शाह योगी यांनी यावं असे दानवे म्हणाले. यावरुन स्थानिक नेतृत्व कमकूवत असल्याचे स्पष्ट होईल असे दानवे म्हणाले.
काही ठिकाणी दोन्ही ठाकरें बंधुच्या संयुक्त सभा होतील.
राज्यात काही ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुच्या संयुक्त सभा होतील. पण संभाजीनगरमध्ये 10 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा ठरलेली आहे. एबी फॉर्म पहिलं व्यवस्थित द्यायचे.आत भाजप आल्यानंतर हे पळवा पळवी सुरू झाल्याची टीका दानवे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
भाजपला सोपं जावं म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले, चंद्रकांत खैरेंचा आरोप
आणखी वाचा
Comments are closed.