नामांकित कंपनीतील बॉसकडून सतत मानसिक छळ, तरुणीचं टोकाचं पाऊल; व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ क्राईम न्यूज : अंबरनाथच्या S-3 पार्क हॉटेलमध्ये एका तरुणीने केलेल्या आत्महत्ये (Ambernath Crime) प्रकरणी भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येस (Crime) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर लोटे याला अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 10 एप्रिल रोजी भगवान लोटे याद्वारे तरुणीला S-3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावून तिच्याशी प्रत्यक्ष, कॉल, चॅटिंग करून वाद घालत मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगवान लोटे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने आरोपीचा शोध घेऊन अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे. (Suicide news Ambernath)

मिळलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही भगवान लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. त्यांच्यात प्रेमसंबंध होते, तसंच लोटे हा मृत तरुणीकडून मनी लॉंडरिंगचं काम करून घेत होता. मात्र, तिला काम सोडण्याची इच्छा असताना तिने काम सोडू नये म्हणून भगवान तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Ambernath Crime News : भगवान लोटे याची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी

दरम्यान, हॉटेलमध्ये तरुणीने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केलीहे. कालांतराने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, तसंच भगवान लोटे याची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात होईल. अशातच देव परतलावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर लोटे याला अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पुढे या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Crime: फौजदार असल्याचे सांगत निलंबित हवालदाराची गुंडगिरी; व्यावसायिकाकडून 40 हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार समोर आला असून, निलंबित पोलिस हवालदाराने स्वतःला पीएसआय असल्याचे सांगत एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत लुटल्याची घटना उघड झाली आहे. गारखेडा परिसरात घडलेल्या या प्रकरणात आरोपीने व्यावसायिकाच्या गाडीची तोडफोड करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने ४० हजार रुपये उकळले, तसेच गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईलही हिसकावला. एवढ्यावरच न थांबता व्यावसायिकाच्या पत्नीला पुन्हा शहरात दिसल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विष्णू सुरेश नानगुडे उर्फ विष्णू पाटील आणि त्याचा चालक रमेश शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.