माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
प्रीतम मुंडे भाजप : भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात डॉ.प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी बहीण पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. तेव्हापासून प्रीतम मुंडे (Pritam Munde) या राजकारणात फारशा सक्रिय नसल्याचे दिसत होते. मात्र, आता पक्षाकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाकडून (BJP) विविध जिल्ह्यांसाठी प्रभारींची नियुक्त करण्यात आली. यामध्ये पक्षाकडून देण्यात आलेल्या संघटनात्मक जबाबदारीमुळे आता डॉ.प्रीतम मुंडे या दोन वर्षानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रीतम मुंडे या बीड जिल्ह्यातील गेवराई आणि माजलगाव मतदार संघाचे काम पाहतील असे भाष्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. मात्र, त्यावेळी प्रीतम मुंडे कुठेही दिसल्या नाहीत. आता माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पश्चिम विभागाची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. (Maharashtra Politics news)
Bhandara news: दोन दिवसात भाजपचे जिल्हा प्रभारी बदलले, भंडाऱ्यात बंटी भांगडिया यांच्या ऐवजी आता रामदास तडस यांच्याकडे जबाबदारी
पक्ष संघटन वाढावं, पक्षाची ध्येयधोरण तळागाळात पोहचून राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकास कामांची माहिती नागरिकांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपने आता जिल्हा प्रभारींची नियुक्ती केली आहे. दोन दिवसांपूर्वी केलेल्या नियुक्तीत भाजपनं फेरबदल केला. परिणय फुके यांच्याकडून जबाबदारी काढून घेत दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्हा प्रभारी म्हणून चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांची नियुक्ती केली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीती भंडाऱ्यात सोमवारी कार्यकर्त्यांची विस्तृत बैठक पार पडली, यात भांगडिया यांच्यावर आगामी पदवीधर मतदार संघाची जबाबदारी देत, कामाला लागण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिलेत. बैठक पार पडली आणि एक दिवसाचे प्रभारी राहिलेल्या बंटी भांगडिया यांची भंडारा जिल्ह्याऐवजी गडचिरोली प्रभारी म्हणून नियुक्ती करताना भंडाऱ्याची जबाबदारी वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांच्याकडे सोपविल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर असून वर्ध्याचे तडस यांच्या नियुक्तीमागे त्यांनी ताकद लावून एकाअर्थी स्वतःकडे भंडाऱ्याची संपूर्ण जबाबदारी एकहाती ठेवली असावी का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.